- प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश संपादन झाले. गुरुवारी आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. शनिवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेत सर्व आमदारांना शपथ दिली जाणार असली तरी त्यावर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) बहिष्कार घातला होता. तशा सूचना देखील शुक्रवारच्या बैठकीत घेण्यात आल्या होत्या. असे असले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या समाजवादी पार्टीच्या अबू आझमी आणि रईस शेख यांनी मात्र विधानसभेत उपस्थित राहून शपथ घेतली. शिवाय त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. याचं खापर त्यांनी उबाठावर फोडलं आहे.
(हेही वाचा – Walmart च्या वेबसाईटवर श्रीगणेशाचा फोटो असलेला स्विमसूट विक्रीला; हिंदूंच्या विरोधानंतर कंपनीचा माफीनामा)
राज्यामध्ये येणाऱ्या काळात विविध महानगरपालिका तसेच नगरपालिकामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाण्याचा आदेशच उद्धव ठाकरे यांनी आपल्या माजी नगरसेवकांना दिल्यामुळे आम्ही नाराज असल्याचे अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना आपला संताप बोलून दाखवला. महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटला जात आहे. त्यातच ६ डिसेंबर रोजी झालेल्या बाबरी मशिद पाडणाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. अशा हिंदुत्ववादी विचारधारेच्या पक्षांबरोबर काम करणे आमच्यासाठी अडचणीचे होऊ शकते. असं कारण देत अबू आझमी यांनी महाविकास आघाडीला सोडण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्यानंतरही अबू आझमी यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
(हेही वाचा – MLA Oath Taking Ceremony : आणि जागा चुकलेल्या कसब्याच्या आमदारांना अजितदादा घेऊन आले…)
विरोधी पक्षामध्ये ताळमेळ नाही
याबरोबरच महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) असलेल्या घटक पक्षांमध्ये एकंदर ताळमेळ दिसून येत नाही. विधान मंडळातील फ्लोर मॅनेजमेंट विरोधकांना जमत नसल्याचे चित्र देखील आज पहावयास मिळाले. शुक्रवारी झालेल्या निर्णयानंतर देखील शिवसेना उबाठाचे आमदार विधान भवनात आले होते. याउलट काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार मात्र सभागृहात बसलेच नाहीत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community