- खास प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या तीन दिवसीय अधिवेशनात सोमवारी ९ डिसेंबर २०२४ या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल. सत्ताधारी भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर यांना पहिली पसंती असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. तर विद्यमान हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांचेही नाव अध्यक्ष पदाच्या स्पर्धेत चर्चेत आहे. (Assembly)
अध्यक्ष निवड बिनविरोध?
विरोधी पक्षातील शिवसेना उबाठा, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (शप) या पक्षातील एकाही आमदाराने शनिवारी ७ डिसेंबर या दिवशी शपथ घेतली नाही. रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. विरोधी पक्षात, विरोधी पक्षनेता निवडला जाईल इतकी (२९) आमदार संख्या एकाही पक्षाला मिळाली नाही, त्यामुळे विरोधी पक्षाकडून अध्यक्षीय उमेदवार देण्याची शक्यता कमी आहे. विद्यमान विधानसभेत सत्ताधारी महायुतीचे २३० आमदार असून विरोधी पक्षाकडे केवळ ४६ आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवड ही बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Assembly)
(हेही वाचा – MVA फुटणार; कॉंग्रेस-‘उबाठा’तील मतभेद चव्हाट्यावर!)
शेलार इच्छुक? पण..
भाजपाकडून विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाच त्या पदावर राहण्यासाठी वरिष्ठांकडून आग्रह धरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष पदापेक्षा मंत्रीपदासाठी अधिक इच्छुक असल्याचे सूत्रांकडून कळते. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या आशीष शेलार यांना पक्ष त्या पदावर बसवू इच्छित नाही. पुढील चार ते सहा महिन्यात मुंबईसह पुणे, नागपूर, ठाणे आणि अन्य प्रमुख महापालिकांच्या निवडणुका लागणार असल्याने शेलार यांची मुंबईत आवश्यकता असल्याने त्यांच्यावर महापालिका निवडणूक काळात महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल अशी शक्यता आहे. (Assembly)
आठ ‘टर्म’मध्ये नऊ विजय
कालिदास कोळंबकर हे गेल्या आठ ‘टर्म’मध्ये नऊ वेळा विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. यात एकदा त्यांच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. २००४ मधील विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या कोळंबकर यांनी २००५ या वर्षात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडले. पक्ष सोडल्याने त्यांची आमदारकी गेली आणि २००६ मध्ये पोटनिवडणूक लागली. त्या पोटनिवडणुकीत कोळंबकर पुन्हा निवडून आले. (Assembly)
(हेही वाचा – भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीसोबत MNS जाईल?)
कोळंबकर यांच्या पसंतीची कारणे
सध्या कोळंबकर यांचे वय ७१ असून त्यांचे ज्येष्ठता लक्षात घेता त्यांना अध्यक्ष म्हणून पसंती मिळू शकते. विरोधी पक्षात केवळ ४६ आमदार असल्याने सभागृहात फार गदारोळ किंवा गोंधळाची स्थितीमुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता फार कमी आहे. विरोधी पक्षातील संख्या कमी असल्याने ४० वर्षे आमदार राहिलेल्या अनुभवी आमदाराला सभागृह चालवणे तुलनेने सोपे आहे. कोळंबकर हे फडणवीस किंवा भाजपाच्या विरुद्ध भूमिका घेऊन पक्षाला किंवा फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीत अडचणीत आणण्याची हिम्मत करू शकत नाहीत. (Assembly)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community