ख्रिसमसमुळे (Christmas Festival) कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष गाडीचे नियोजन करण्यात आले आहे. अहमदाबाद ते थिविम (Ahmedabad-Thivim Special Train) या मार्गावर कोकण रेल्वे (kokan Railway) मार्गे धावणारी विशेष फेस्टिवल गाडी येत्या ८ डिसेंबरपासून २ जानेवारी २०२५ या कालावधीत चालविण्यात येणार आहे. (Ahmedabad-Thivim Special Train)
(हेही वाचा – Bangladesh: ढाकामध्ये इस्कॉन मंदिरावर पुन्हा हल्ला, तोडफोडीनंतर धर्मांध मुसलमानांनी जाळली मूर्ती)
विशेष गाडी (Special Train) ही आठवड्यातून दोनदा धावणार आहे. अहमदाबाद येथून ही गाडी (Train number 09412) रविवार तसेच बुधवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि गोव्यात थिविम स्थानकावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (Train number 09411) थिविम येथून सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि अहमदाबादला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी कोकणात पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे थांबेल. गाडीला एकूण १५ एलएचबी डबे असतील.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community