येत्या १ जानेवारीपासून जुनी Biometric Attendance बंद; नवीन फेशियल बायोमेट्रिक हजेरी न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निघणार नाही पगार

8316
येत्या १ जानेवारीपासून जुनी Biometric Attendance बंद; नवीन फेशियल बायोमेट्रिक हजेरी न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निघणार नाही पगार
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांची कार्यालयीन उपस्थिती लिनक्स आधारित फेशियल बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचा अवलंब केला जाणार असून येत्या एक जानेवारी २०२५ पासून जुनी बायोमेट्रिक हजेरी (Biometric Attendance) प्रणाली बंद होणार आहे. या फेशियल बायोमेट्रिक मशीन करता बुधवारी ४ डिसेंबर २०२४ रोजीपर्यंत या मशीनवरील हजेरीकरता ६९,९७७ कर्मचाऱ्यांनी आपल्या हजेरीची नोंदणी केली आहे. परंतु सुमारे २१ हजार कर्मचाऱ्यांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही. त्यामुळे पुढील ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत याबाबतची नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास आणि फेशियल बायोमेट्रिक हजेरी न नोंदवल्यास येत्या जानेवारीपासून कर्मचाऱ्यांचे पगार थेट कापलेच जाणार आहे. त्यामुळे जे कर्मचारी फेशियल बायोमेट्रिक मशीनवर नोंदणी करून आतापासूनच हजेरी नोंदवत नसतील तर येत्या महिन्यापासून हजेरीअभावी पगार कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – BMC : दादरच्या केशवसूत पुलाखालील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम नियमबाह्य, मनसेने घेतला आक्षेप)

मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांची कार्यालयीन उपस्थिती लिनक्स आधारित फेशियल बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविणे आणि यासाठी रजा व्यवस्थापन प्रणाली तसेच सध्याच्या हजेरी संगणक प्रणालीत बदल तथा सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. सध्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांची हाताच्या बोटांच्या ठशांद्वारे कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवली जाते. हाताच्या बोटांच्या ठशाद्वारे उपस्थिती नोंदवायची सध्याची बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे (Biometric Attendance) मेणाच्या अंगठ्याच्या वापर करून बोगस उपस्थिती नोंदवण्याचे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे सध्याची बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद करून नवीन फेशियल बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचा वापर करण्याच्या दृष्टीकोनातून प्रायोगिक तत्वावर १५० मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या फेशियल प्रणालीचा वापर केल्यास कोणत्याही दिवसाच्या उपस्थितीसाठी प्रथम नोंदित वेळ व अंतिम नोंदित वेळ ग्राह्य धरण्यात येते. सुमारे १०० कर्मचाऱ्यांकरता एक याप्रमाणे फेशियल बायोमेट्रिक मशिन खरेदी करण्यात येत असून त्यानुसार आतापर्यंत विविध कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार १८०० मशिन्स बसवण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग आणि यांत्रिक व विद्युत विभागाच्या माध्यमातून दिली जात आहे.

(हेही वाचा – Bangladesh: ढाकामध्ये इस्कॉन मंदिरावर पुन्हा हल्ला, तोडफोडीनंतर धर्मांध मुसलमानांनी जाळली मूर्ती)

सामान्य प्रशासन विभागाच्या म्हणण्यानुसार, येत्या १ जानेवारी २०२५ पासून जुनी बायोमेट्रिक हजेरी (Biometric Attendance) प्रणाली बंद करण्यात आली असून आतापर्यंत फेसिअल बायोमेट्रिक हजेरी प्रणालीच्या वापराकरता महापालिकेच्या विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांपैंकी बुधवार ४ डिसेंबर २०२४ पर्यंत सुमारे ७० हजार कर्मचाऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. तर सुमारे २१ हजार कर्मचाऱ्यांनी या नवीन प्रणालीकरता नोंदणी केलेली नाही. त्यामुळे उर्वरीत २० दिवसांमध्ये या प्रणालीच्या वापराकरता कर्मचाऱ्यांनी नोंदणी न केल्यास त्यांना फेसिअल बायोमेट्रिक हजेरी नोंदवता येणार नाही. परिणामी येत्या १ जोनवारीपासून जुनी बायोमेट्रिक हजेरी (Biometric Attendance) बंद झाल्यास त्यांना फेसिअल बायोमेट्रिक हजेरी नोंदवता येणार नसल्याने त्यांच्या फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या जानेवारी महिन्याच्या मोठा फरक दिसून येणार आहे. यामध्ये पगाराची रक्कम कापली जाणे किंवा पूर्णपणे हजेरी अभावी पगारच न होणे असे प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी अद्यापही आपली हजेरी बाबतची नोंदणी नवीन फेसिअल बायोमेट्रिक हजेरीबाबत नोंदणी केली नसेल त्यांनी त्वरीत ही नोंदणी करावी असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने केले जात आहे.

(हेही वाचा – महाराष्ट्रातील महिला Income Tax भरण्यात देशात पहिल्या क्रमांकावर)

कर्मचाऱ्यांनी, कुठे जाऊन करावी नोंदणी?

ज्या कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक फेशियल सेल्फ रजिस्ट्रेशन केलेले नाही अशा कर्मचाऱ्यांनी रजिस्ट्रेशन करण्याकरिता https://bmc.face-attendance.in/face-registration (Web URL Link) ही लिंक जाऊन आपली हजेरीबाबतची नोंदणी करावी, असे सामान्य प्रशासनाने आवाहन केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.