No Parking मध्ये वाहन लावल्यास आता दंड आणि ‘टोईंग’चा भुर्दंडही भरावा लागणार

109

वाहतूक विभागाचा (Department of Transport) आदेश झुगारून नागरिकांकडून ‘नो पार्किंग झोन’मध्ये (No Parking), रस्त्यावर, जागा मिळेल त्या ठिकाणी बेकायदा वाहने लावली जात असल्याने वाहतूक कोंडीत (Traffic) भर पडत आहे. ही कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी टोइंग व्हॅन (Towing van) प्रकल्प कार्यान्वित केला आहे. अशा पद्धतीने वाहन लावल्यास टोइंगचा खर्च, वस्तू आणि सेवा करासह (जीएसटी) दंड वसूल केला जाणार आहे. दुचाकीसाठी ७३६ रुपये, तर चारचाकीसाठी ९७२ रुपये दंड आकारला जाणार आहे. (No Parking)

(हेही वाचा – महाराष्ट्रातील महिला Income Tax भरण्यात देशात पहिल्या क्रमांकावर)

पिंपरी-चिंचवड पोलीस (Pimpri-Chinchwad Police) आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण, भोसरी, तळेगाव हे औद्योगिक क्षेत्र, हिंजवडी, तळवडे ही माहिती आणि तंत्रज्ञान नगरी असून देहू आणि आळंदी तीर्थक्षेत्रे आहेत. यासह मोठ्या बाजारपेठा, तसेच शैक्षणिक आणि व्यापारी संकुले आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. दुचाकी, तसेच चारचाकी वाहनांचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून, अनेकजण दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर करीत असतात. मात्र, काही जण पार्किंगचे नियम न पाळता बेशिस्तीने कुठेही वाहन पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा (Traffic obstruction) निर्माण होतो. अशा वाहनांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून (Pari-Chinchwad Transport Division) कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.