…तर सध्याचे सरकार हे अखेरचे हिंदुत्ववादी सरकार ठरेल; Ranjit Savarkar यांचा इशारा

रणजित सावरकर हे अरूण जोशी शिक्षण महाविद्यालय, हनुमान नगर, नागपूर येथे शनिवार, 7 डिसेंबर 2024 ला 'जागृती विशेषांका'चे प्रकाशन करण्याकरिता आले होते.

115

जर या सरकारने घुसखोरीच्या समस्येवर त्वरित तोडगा काढला नाही तर लवकरच असंख्य मतदार संघात हिंदुत्व विरोधी शक्ती प्रबळ होतील आणि सध्याचे सरकार हे अखेरचे हिंदुत्ववादी सरकार ठरेल, असा इशारा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित विक्रमराव सावरकर (Ranjit Savarkar) यांनी दिला.

रणजित सावरकर हे अरूण जोशी शिक्षण महाविद्यालय, हनुमान नगर, नागपूर येथे शनिवार, 7 डिसेंबर 2024 ला ‘जागृती विशेषांका’चे प्रकाशन करण्याकरिता आले होते. याप्रसंगी हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्‍वस्त व माजी अध्यक्ष अरूण जोशी यांनी रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांचा शाल, श्रीफळ व स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र भेट देऊन सत्कार केला.

(हेही वाचा Walmart च्या वेबसाईटवर श्रीगणेशाचा फोटो असलेला स्विमसूट विक्रीला; हिंदूंच्या विरोधानंतर कंपनीचा माफीनामा)

महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी जनतेने एकजूट दाखवल्यामुळे आज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. अर्थात आज महायुतीला विधानसभेत प्रचंड बहुमत मिळाले असले तरीही सुमारे 120 जागांवरील विजय हा 20000 पेक्षा कमी मताधिक्याने मिळालेला आहे. ही एक महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रात आज सुमारे एक कोटीच्या आसपास बांगलादेशी घुसखोर असून त्यापैकी अनेक जण बेकायदेशीररित्या मतदार बनले आहेत. त्यामुळे जर या सरकारने घुसखोरीच्या समस्येवर त्वरित तोडगा काढला नाही तर लवकरच असंख्य मतदार संघात हिंदुत्व विरोधी शक्ती प्रबळ होतील आणि सध्याचे सरकार हे अखेरचे हिंदुत्ववादी सरकार ठरेल, असे रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले.

या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याच्या अभ्यासिका डॉ. मेधा मोहरील यांचा रणजित सावरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महालक्ष्मी जोशी यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते. ‘वंदे मातरम्च्या’ जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.