राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्या हस्ते ११ डिसेंबरला राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचे वितरण; पुरस्कारात महाराष्ट्र द्वितीय स्थानी

137
पंचायत राज मंत्रालयाने (Ministry of Panchayat Raj) उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत संस्थांना राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार जाहीर केले आहेत. यात महाराष्ट्राला द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाला. भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार’ (National Panchayat Award) ११ डिसेंबरला वितरित करण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीस्थित विज्ञान भवनात हा कार्यक्रम होईल. महाराष्ट्रातील जवळपास ६ पंचायत राज संस्थांना या कार्यक्रमांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येतील. तसेच या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह केंद्रीय पंचायतराज मंत्री राजीव रंजन सिंह तसेच पंचायतराज विभागाचे राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल, या विभागाचे सचिव विवेक भारद्वाज उपस्थित राहतील. (Droupadi Murmu)

विविध श्रेणींमध्ये ४५ पुरस्कारांपैकी प्रत्येकी सात पुरस्कारांसह ओडिशा आणि त्रिपुरा संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर आहेत. सहा पुरस्कारांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर (Maharashtra second position in National Panchayat Award ), तर आंध्र प्रदेश चार पुरस्कारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. बिहार आणि हिमाचल प्रदेशने प्रत्येकी तीन श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले आहेत. दरम्यान, एकात्मिक विकासाभिमुख नियोजनामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)  यांनी व्यक्त केली.   
(हेही वाचा – …तर सध्याचे सरकार हे अखेरचे हिंदुत्ववादी सरकार ठरेल; Ranjit Savarkar यांचा इशारा)
… तर या जिल्ह्यातील गावाला मिळणार पुरस्कार
महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांमधील ६ पंचायत राज संस्थांना संस्थांना पुरस्कार मिळणार आहेत. या कार्यक्रमाला देशभरातील मान्यवर, वरिष्ठ अधिकारी आणि पंचायत प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमात पंचायत राजशी संबंधित विविध श्रेणीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येतील. 
हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.