विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election 2024) मतांचे आकडे मांडून ‘फेक नॅरेटिव्ह’ (fake narrative Sharad pawar) तयार करू पाहणाऱ्या शरद पवारांची (Sharad Pawar) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलखोल केली आहे. “आपण ज्येष्ठ नेते आहात. किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका,” असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. (Devendra Fadnavis)
कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार (Sharad Pawar Kolhapur press conference) यांनी विधानसभेतील मतदानाच्या आकड्यांवर शंका उपस्थित केली. ते म्हणाले की, “आमच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीतील ७२ लाख मते आहेत. मात्र, आमचे उमेदवार दहा निवडून आले. अजित पवारांना (Ajit Pawar) ५८ लाख मते मिळाली, त्यांचे ४१ उमेदवार निवडून आले. ८० लाख मत मिळालेल्या काँग्रेस पक्षाचे १५, तर ७९ लाख मते मिळालेल्या शिवसेनेचे ५७ आमदार निवडून आले. हे आकडे आश्चर्यकारक आहेत. ‘इव्हीएम’ बाबत माझ्याकडे अधिकृत आकडेवारी नाही, त्यामुळे यावर आताच बोलता येणार नाही,” असे पवार यांनी सांगितले.
(हेही वाचा – राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्या हस्ते ११ डिसेंबरला राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचे वितरण; पुरस्कारात महाराष्ट्र द्वितीय स्थानी)
शरद पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, “शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात. किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मते मिळणूनही कमी जागा कशा ? चला २०२४ च्या लोकसभेत काय झाले ते पाहू. भाजपाला मते १ कोटी, ४९ लाख, १३ हजार, ९१४ आणि जागा नऊ. पण, काँग्रेसला मते ९६ लाख, ४१ हजार, ८५६ आणि जागा १३. शिवसेनेला ७३ लाख, ७७ हजार, ६७४ मते आणि सात जागा, तर शरदचंद्र पवार गटाला ५८ लाख, ५१ हजार, १६६ मते आणि आठ जागा. २०१९च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला ८७ लाख, ९२ हजार, २३७ मते होती आणि एक जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला ८३ लाख, ८७ हजार, ३६३ मते होती आणि जागा चार आल्या. त्यामुळे पराभव स्वीकारला, तर यातून लवकर बाहेर याल. तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे,” असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community