Dhule Railway Station : धुळे रेल्वे स्टेशन इतिहास माहित आहे का तुम्हाला? चला तर जाणून घेऊया…

56
Dhule Railway Station : धुळे रेल्वे स्टेशन इतिहास माहित आहे का तुम्हाला? चला तर जाणून घेऊया...
Dhule Railway Station : धुळे रेल्वे स्टेशन इतिहास माहित आहे का तुम्हाला? चला तर जाणून घेऊया...
धुळे हे महाराष्ट्रातलं तसंच भारतातलं मध्य प्रदेशातलं सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याच्या वायव्य भागात धुळे हे शहर वसलेलं आहे. तसंच हे शहर पश्चिम खानदेश म्हणून ओळखलं जातं. पांजरा नदीच्या काठावर वसलेलं हे धुळे हे शहर MIDC, RTO आणि MTDC चं प्रादेशिक मुख्यालय आहे. (Dhule Railway Station)
हे शहर प्रामुख्याने आदिशक्ती एकवीरा आणि इथे असलेल्या प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिरासाठी ओळखलं जातं. या शहरात जैन मंदिरं आणि धर्मशाळा शहरात असल्यामुळे धुळे हे जैन धर्माचं महत्त्वाचे स्थान बनलं आहे. (Dhule Railway Station)
धुळे शहर हे औद्योगिक क्षेत्र, शाळा, रुग्णालयं आणि निवासी क्षेत्रं असलेलं शहर आहे. या शहरामध्ये दळणवळण आणि वाहतूकीच्या पायाभूत सुविधा आहेत. धुळे हे शहर राज्यभरात कापड, खाद्यतेल, माहिती तंत्रज्ञान आणि यंत्रमागाचे आगामी हब म्हणून मोठ्या प्रमाणात उदयास येत आहे. तसंच हे शहर NH-३, NH-६, आणि NH-२११ या राष्ट्रीय महामार्गांच्या जंक्शनवर असल्याने या शहराला धोरणात्मक फायदा झाला आहे. अलीकडेच भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने आजूबाजूच्या ४ राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धुळे हे शहर ७ राष्ट्रीय महामार्गांच्या अभिसरणावर स्थित असलेल्या भारतातल्या मोजक्या शहरांपैकी एक असेल.  (Dhule Railway Station)
धुळे शहर हे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे. छोट्या शहरांमध्ये रोजगार निर्मितीचा एक भाग म्हणून, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने धुळे येथे बीपीओ सेट करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. (Dhule Railway Station)
धुळे रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्र राज्यामध्ये धुळे जिल्ह्यात येथे स्थित आहे. धुळे शहरामध्ये एक रेल्वे टर्मिनस आहे. हे रेल्वे टर्मिनल्स चाळीसगाव इथल्या जवळच्या रेल्वे जंक्शनला जोडलेलं आहे. या दोन स्थानकांदरम्यान एक पॅसेंजर ट्रेन दिवसातून चार वेळा धावते. तसंच धुळे ते सीएसएमटी या दैनंदिन एक्स्प्रेस गाड्या दररोज धावतात. धुळे हे रेल्वे स्थानक पुणे आणि नांदेडला चाळीसगाव आणि मनमाड येथून जोडलेल्या ट्रॅकने जोडलेलं आहे. (Dhule Railway Station)
धुळे रेल्वे स्थानकाचा इतिहास
चाळीसगाव ते धुलिया शाखा हा रेल्वे मार्ग चाळीसगाव येथे मुंबई-भुसावळ मार्गावरून जातो. तसंच धुळे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी हा लोहमार्ग उत्तरेकडे जातो आणि धुळे येथे संपतो. (Dhule Railway Station)
हा रेल्वेमार्ग १९०० साली वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. हा लोहमार्ग एक ब्रॉड-गेज म्हणजेच ५ फूट ६ इंच एकल मार्ग आहे. हा मार्ग सुमारे १७ मैल लांबीचा आहे. या मार्गावर असलेली जामदा आणि राजमाने ही रेल्वे स्थानकं चाळीसगाव येथुन अनुक्रमे ९ आणि १५ मैल अंतरावर असून धुळे जिल्ह्यातली दोनच रेल्वे स्थानके आहेत. चाळीसगाव ते धुळे या लोहमार्गावर आता रेल्वेचं विद्युतीकरण झालं आहे. (Dhule Railway Station)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.