Gadchiroli बाबत ‘या’ विकासाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

71
Gadchiroli बाबत 'या' विकासाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
Gadchiroli बाबत 'या' विकासाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

गडचिरोली (Gadchiroli) हा महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि जिल्ह्याचं प्रशासकीय मुख्यालयही आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याचा जवळपास ७०% भाग हा हिरव्यागार जंगलांनी व्यापलेला आहे. या शहरातून वाहणारी मुख्य नदी म्हणजे ‘वैनगंगा’ होय. पावसाळ्यामध्ये हा संपूर्ण जिल्हा हिरवागार झालेला असतो.

या जिल्ह्यात बहुतेक वेळेस पूर येण्याची शक्यताही असते. गडचिरोली (Gadchiroli) हे शहर इथे असलेल्या घनदाट जंगलांसाठी ओळखलं जातं. इथल्या जंगलांमध्ये सागाच्या लाकडाचा व्यवसाय करण्यात येतो. बांबूचाही व्यापार केला जातो. बांबूचा वापर वेगवेगळ्या कलाकुसरीसाठी करण्यात येतो.

(हेही वाचा – १२ ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या नाशिक trimbakeshwar temple ची माहिती, जाणून घ्या)

गडचिरोली येथील काही उल्लेखनीय ठिकाणे
  • चपराळा वन्यजीव अभयारण्य
  • सेमाना – हनुमान मंदिर
  • हेमलकसा – बाबा आमटे आणि त्यांचं कुटुंब हे थोर समाजसेवी आहेत. त्यांनी रंजल्या-गांजलेल्या लोकांचं पुनर्वसन केलं. तसंच बाबा आमटेंचे पुत्र प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी हे दोघे डॉक्टर असून हेमलकसा येथे ‘लोकबिरादरी प्रकल्प’ या नावाने आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात. या दवाखान्यात प्राण्यांवरही उपचार केले जातात.
  • अल्लापल्ली – हे जिल्ह्याचं सागवान शहर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी सर्व वन प्रशासन कार्यालये, मुख्य बाजारपेठ, शैक्षणिक आणि इतर संसाधनं आहेत.
  • मरखंडा – वैनगंगेच्या काठावर वसलेलं महादेवाचं मंदिर येथे आहे.
  • BILT (आष्टी) – बल्लारपूर पेपर मिलचं एक युनिट आष्टी येथे आहे.
  • गडचिरोली तलाव – हा तलाव शहराच्या मध्यभागी आहे.
  • वैरागड किल्ला – हा किल्ला आरमोरी शहराजवळ गोंड राजांनी त्यांचं निवासस्थान म्हणून बांधला होता.
  • भंडारेश्वर – खोब्रागडी आणि वैनलोचना या नद्यांच्या संगमाकाठी एका डोंगरमाथ्यावर वैरागड नावाच्या गावाच्या पश्चिमेला असलेलं हे महादेवांचं एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचं एक उत्तम उदाहरण आहे. मंदिराच्या भिंतींवर असलेलं कोरीवकाम हे हेमाडपंथ काळातलं असल्याचं मानले जाते.
  • आदिशक्ती मंदिर – हे मंदिर वैरागड किल्ल्यावर आहे. या मंदिरात आदिशक्ती देवीची मूर्ती आहे. ही मूर्ती १९८६ सालच्या उत्खननात सापडली होती. ही मूर्ती म्हणजे पूर्वीच्या काळातील शिल्पकारांनी साकारलेल्या शिल्पकला आणि कोरीव कामाचं उत्कृष्ट उदाहरण आहे.
  • वडाधाम फॉसिल्स पार्क
गडचिरोली जिल्ह्यातली वाहतूक

गडचिरोली (Gadchiroli) हा जिल्हा चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदियाला रस्त्यांनी जोडलेला आहे. तसंच गडचिरोलीमध्ये रेल्वेसाठी लोहमार्गही आहे. इथल्या नक्षलवादी लोकांविरूद्ध नागरिकांना सुधारित सुरक्षा देण्यासाठी या परिसरातली रस्त्यांची स्थिती सुधारली जात आहे.

शिक्षण

गडचिरोलीतलं (Gadchiroli) सर्व डिग्री कॉलेज हे गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीशी संलग्न आहेत. महाराष्ट्र सरकारने आरटीएम नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून गोंडवाना विद्यापीठाची स्थापना केली. ही घटना जिल्ह्यातल्या आदिवासी तरुणांसाठी एक मोठी शैक्षणिक क्रांती आहे.

तसंच या जिल्ह्यात चाणक्य अकादमी अहेरी आणि आलापल्ली इथे स्पर्धा परीक्षा कोचिंग सेंटर आहे.

याव्यतिरिक्त चाणक्य अकादमी पोलीस भारती फिजिकल ग्राउंड, अहेरी येथे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.