थोर महापुरूष, देव – देवता, संत महंतांचे स्मरण करत, राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या (Maharashtra Legislature Special Session 2024) दुसऱ्या दिवशी १०६ लोकप्रतिनिधींनी आमदारकीची शपथ घेतली. पहिल्या दिवशी १७३ आमदारांनी शपथ घेतल्याने आतापर्यंत २७९ आमदार शपथबद्ध झाले आहेत. उर्वरित आठ आमदार अनुपस्थित राहिल्याने त्यांचा शपथविधी सोमवारी पार पडणार आहे. त्यानंतर विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांनी स्थगित केले.
विधिमंडळाच्या दुसऱ्या दिवसाची सकाळी ११ वाजता सुरूवात कामकाजाला झाली. पहिल्या दिवशी शपथविधी बहिष्कार टाकणाऱ्या महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींपासून शपथविधाला सुरूवात झाली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदारकीची पहिली शपथ घेतली. हातात संविधानाचे पुस्तक घेऊन सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. विजय वडेट्टीवार, असलम शेख, ज्योती वाघमारे यांनी सभागृहात संविधान दाखवत शपथ पूर्ण केली. अनेक आमदारांनी संत महंतांचे स्मरण केले. शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि वंदे मातरम् म्हणत सभागृहाचे लक्ष वेधले. सुनील प्रभू यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले. तर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी बिरोबाला साकडे घालत, बाळूमामाच्या नावाने चांगभल, अशी घोषणा दिली. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी जय गिरनारी असे म्हणत शपथ घेतली. आमश्या पाडवी यांच्यासह आदिवासी भागातील आमदारांनी आदिवासी ग्रामदेवतांचे स्मरण केले. अनेकांनी जय जवान, जय किसान अशा घोषणा देखील यावेळी दिल्या. (Maharashtra Legislature Special Session 2024)
(हेही वाचा – लातूर जिल्ह्यातील १०३ शेतकऱ्यांच्या जमिनीवर Waqf Board चा दावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही अन्याय…)
विक्रम पाचपुते यांचे नाव चुकले
शपथविधी नावाच्या यादीत माजी मंत्री तथा दिवगंत आमदार बबनराव पाचपुते यांचे चिंरजीव विक्रम पाचपुते यांचे नाव चुकले. विक्रम ऐवजी विकास झाल्याची चूक हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांनी विधिमंडळ सचिवालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर विक्रम पाचपुते यांनी शपथ पूर्ण केली.
आठ आमदार अनुपस्थितीत
विशेष अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांच्या शपथ विधीसाठी ठेवले. तर तिसऱ्या दिवशी राज्यपाल अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड असा कार्यक्रम जाहीर केला. २८८ पैकी पहिल्या दिवशी १७३ तर दुसऱ्या दिवशी १०६ आमदारांनी शपथ घेतली. दरम्यान, उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनिल शेळके अनुपस्थित राहिले. त्यापैकी जंयत पाटील (Jayant Patil) यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने उपस्थित राहणार नाही, असे पत्र विधिमंडळाला दिले होते. (Maharashtra Legislature Special Session 2024)
दोघांची संस्कृत तर एका आमदाराने अहिराणी भाषेत शपथ
पहिल्या दिवशी सात जणांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली होती. तर दुसऱ्या दिवशी मंगलप्रभात लोढा आणि सत्यजित देशमुख या दोन आमदारांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. अनुप अगरवाल यांनी अहिराणी भाषेत तर साजीद खान यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली. उर्वरित आमदारांनी मराठी भाषेत शपथ पूर्ण केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community