आगामी काळात मानवरहित ड्रोनचा धोका गंभीर होणार आहे, म्हणून भारत लवकरच आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी एक व्यापक अँटी-ड्रोन युनिट तयार करणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घोषित केले. बीएएसएफच्या (BSF) 60 व्या स्थापना दिनानिमित्त जोधपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लेझर-सुसज्ज अँटी-ड्रोन गन-माउंट सिस्टमचे सुरुवातीचे परिणाम उत्साहवर्धक असल्याचे अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितले.
(हेही वाचा Maharashtra Legislature Special Session 2024 : विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी १०६ आमदारांनी घेतली शपथ)
या सिस्टममुळे पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन निष्क्रिय करणे आणि त्यांचा शोध घेण्याच्या घटनांमध्ये 3 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. येत्या काळात ड्रोनचा धोका अधिक गंभीर होणार आहे. अशा परिस्थितीत संरक्षण आणि संशोधन संस्था व डीआरडीओ यांच्या सहकार्याने ‘संपूर्ण सरकारी’ दृष्टिकोनाने आम्ही या समस्येचा सामना करत आहोत. त्यामुळे आगामी काळात आम्ही देशासाठी सर्वसमावेशक अँटी ड्रोन युनिट तयार करणार आहोत, असे अमित शाह यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारने भारताच्या सीमेवर कुंपण, रस्ते आणि इतर गोष्टींसाठी मोठा अर्थसंकल्प मंजूर केला आहे, असेही अमित शाह (Amit Shah) यांनी सांगतिले.
Join Our WhatsApp Community