Maharashtra Weather : राज्यात थंडी रिटर्न ! कसा असेल थंडीचा अंदाज ?

159
Maharashtra Weather : राज्यात थंडी रिटर्न ! कसा असेल थंडीचा अंदाज ?
Maharashtra Weather : राज्यात थंडी रिटर्न ! कसा असेल थंडीचा अंदाज ?

चक्रीवादळ आणि कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर ओसरलेला असतानाच राज्यात आता मोठ्या विश्रांतीवर गेलेली थंडी (Maharashtra Weather) पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. मागील दोन आठवड्यांपासून राज्यावर पावसाचं सावट पाहायला मिळालं. किंबहुना काही भागांना या अवकाळी पावसानं झोडपलं. पण, आता मात्र पावसानं राज्याकडे पाठ फिरवली असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका (Cold weather ) पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. (Maharashtra Weather)

हेही वाचा- CM Devendra Fadnavis : देवेंद्र पर्व ३.० पुढील आव्हाने!

पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे आणि उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये शीतलहरींचा प्रभाव वाढल्यामुळे राज्यातही तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तापमान पुन्हा एकदा 10 अंशांहून कमी असल्याचं लक्षात येत आहे. तर, किनारपट्टी क्षेत्र असणाऱ्या कोकणापासून मुंबईपर्यंतसुद्धा (Mumbai) तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. हवामानाची ही स्थिती पुढील 24 ते 48 तास कायम राहिल्यास निरभ्र आकाश आणि तापमानातील घट पाहता थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. (Maharashtra Weather)

हेही वाचा-Uddhav Thackeray : तो पुन्हा घरी बसला…

८ ते १३ डिसेंबरदम्यान राज्यातील शहरांचा पारा १०, तर मुंबई महानगरातील शहरांचा पारा १६ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. परिणामी, आठवडाभर गायब असलेली थंडी आता कमबॅक करणार आहे.नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील शहरांचा किमान तापमानाचा पारा १० अंशांवर आला होता, तर मुंबई १६ अंशांवर उतरली होती. मात्र, हवामानात झालेल्या उल्लेखनीय बदलामुळे गेल्या आठवड्यात किमान तापमानात वाढ झाली. (Maharashtra Weather)

हेही वाचा-ताबिशच्या Love jihad ची शिकार ठरली हिंदू तरुणी; निकाहानंतर इस्लाम स्विकारण्यास दबाव, गर्भपात आणि…

“उत्तर मध्य महाराष्ट्रातील शहरांच्या किमान तापमानात बऱ्यापैकी घसरण होईल. मराठवाड्यातही तापमान खाली येईल. कमाल ३५ आणि किमान तापमान १० ते १३ अंश नोंदविले जाईल. विदर्भातही हलक्याशा थंडीची नोंद होईल, तर मुंबईसह लगतच्या परिसरातील शहरांचे किमान तापमान १३ ते १५ अंश नोंदविली जाईल.” असे हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Weather)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.