Ramesh Bornare : शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी आमदार रमेश बोरनारेंची नियुक्ती; आमदारांना तातडीने व्हीप जारी !

128
Ramesh Bornare : शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी आमदार रमेश बोरनारेंची नियुक्ती; आमदारांना तातडीने व्हीप जारी !
Ramesh Bornare : शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी आमदार रमेश बोरनारेंची नियुक्ती; आमदारांना तातडीने व्हीप जारी !

शिवसेनेत मंत्री कोण होणार याची मोठी उत्सूकता असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या (Shivsena) मुख्य प्रतोदपदी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांची निवड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. प्रतोदपदी नियुक्ती झाल्याबरोबर रमेश बोरनारे सक्रीय झाले. त्यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे. आजच्या कामकाजात सर्व आमदारांना सहभागी राहण्याचे आदेश व्हीपद्वारे दिले आहेत. (Ramesh Bornare)

विधिमंडळाचं सध्या विशेष अधिवेशन (Special Session) सुरु आहे. या अधिवेशनाचा आज (९ डिसेंबर) शेवटचा दिवस आहे. विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या सभागृहात विश्वास दर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. यावेळी सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश मुख्य प्रतोद रमेश बोरनारे यांनी व्हीपद्वारे दिला आहे. (Ramesh Bornare)

व्हीपमध्ये नेमकं काय ?
“शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सर्व विधानसभा सदस्यांना पक्षादेश बजावण्यात येत आहे की, शनिवारी, 7 डिसेंबर 2024 पासून मुंबईत विधान भवन येथे विधिमंडळाचं विशेष अधिवेश सुरु होत आहे. या अधिवेशादरम्यान 9 डिसेंबर 2024 ला सरकारचा विश्वासदर्शक प्रस्ताव आहे. शिवसेना पक्षाच्या विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहून विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावे, असा पक्षादेश आहे.” असं मुख्य प्रतोद रमेश बोरनारे यांनी व्हीपमध्ये म्हटलं आहे. (Ramesh Bornare)

रमेश बोरनारे कोण आहेत?
रमेश बोरनारे हे वैजापूरचे विद्यमान आमदार आहेत. ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील याच मतदारसंघातून निवडून आले होते. रमेश बोरनारे हे एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत. शिंदे यांनी शिवसेनेत मोठं बंड पुकारलं त्यावेळी रमेश बोरनारे यांनी त्यांना खमकी साथ दिली होती. गुवाहाटीला जाणाऱ्या 40 शिवसेनेच्या आमदारांमध्ये रमेश बोरनारे यांचादेखील समावेश होता. विशेष म्हणजे 2022 ला झालेल्या सत्तांतरानंतर शिंदेंनी शिवसेना आमदार भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद केलं होतं. पण यावेळी रमेश बोरनारे यांना संधी देण्यात आली आहे. कदाचित शिंदे यावेळी भरत गोगावले यांना मंत्रिपदाची संधी देणार आहेत. त्यामुळे प्रतोद पदी रमेश बोरनारे यांची वर्णी लागल्याची चर्चा आहे. (Ramesh Bornare)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.