-
ऋजुता लुकतुके
ॲडलेड कसोटीत भारताचा १० गडी राखून पराभव केल्यावर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि भारताने आपापसातच जागा बदलल्या आहेत. म्हणजे ऑस्ट्रेलियन संघ आता अव्वल स्थानावर पोहोचला आहे. तर भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. क्रमवारीतील पहिल्या दोन संघांना जूनमध्ये लॉर्ड्सवर होणाऱ्या अंतिम फेरीत खेळता येणार आहे. त्यामुळे बोर्डर – गावसकर मालिकेतील ३ कसोटी आता बाकी असताना भारतीय संघ कोंडीत सापडला आहे. (ICC Test Championship)
(हेही वाचा- Uttar Pradesh सरकारने उतरवले २००० मशिदींवरील भोंगे; मौलानांचे सरकारवर आरोप)
ॲडलेड कसोटीत भारतीय फलंदाजी ढेपाळली. पहिल्या डावांत १८० धावांत बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाने ३३७ धावा करत १५७ धावांची आघाडी घेतली ती ट्रेव्हिस हेडच्या १४० धावांच्या जोरावर. दुसऱ्या डावांत पुन्हा एकदा भारतीय संघाला १७५ धावांमध्ये गुंडाळत भारतीय ऑस्ट्रेलियाने तिसऱ्याच दिवशी ही कसोटी जिंकली. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियन संघ एका दिवसासाठी का होईना पण, अव्वल स्थानावर पोहोचला आहे. कारण, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेदरम्यानची कसोटी गेबेखा इथं सुरू आहे. श्रीलंकेला पाचव्या दिवशी विजयासाठी आणखी १४३ धावा हव्या आहेत. त्यांचे शेवटचे ५ गडी शिल्लक आहेत. ही कसोटी आफ्रिकन संघाने जिंकली तर ते पुन्हा अव्वल स्थानावर जातील. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर घसरले. भारतीय संघाला मात्र आता निर्विवाद वर्चस्वासाठी उर्वरित ३ कसोटी जिंकणं आवश्यक आहे. (ICC Test Championship)
आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ |
|||||||
क्रमांक |
संघ |
कसोटी |
विजय |
पराभव |
अनिर्णित |
गुण |
यशाची टक्केवारी |
१ |
ऑस्ट्रेलिया |
१४ |
९ |
४ |
१ |
१०२ |
६०.७१ |
२ |
द आफ्रिका |
९ |
५ |
३ |
१ |
६४ |
५९.२६ |
३ |
भारत |
१६ |
९ |
६ |
१ |
११० |
५७.२९ |
४ |
श्रीलंका |
१० |
५ |
५ |
० |
६० |
५० |
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची तिसरी कसोटी ब्रिस्बेन इथं १४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community