Jasprit Bumrah Injury Update : जसप्रीत बुमराला दुखापत नाही तर फक्त थकवा, मॉर्केल यांनी केलं स्पष्ट

Jasprit Bumrah Injury Update : बुमराने त्यावर फिजीओकडून उपचार घेतले आहेत 

84
Jasprit Bumrah Injury Update : जसप्रीत बुमराला दुखापत नाही तर फक्त थकवा, मॉर्केल यांनी केलं स्पष्ट
Jasprit Bumrah Injury Update : जसप्रीत बुमराला दुखापत नाही तर फक्त थकवा, मॉर्केल यांनी केलं स्पष्ट
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर – गावसकर मालिकेत जसप्रीत बुमरा आतापर्यंत भारतीय संघाचा तारणहार ठरला आहे. पर्थ कसोटीत ८ आणि ॲडलेड कसोटीतही पहिल्या डावांत ४ बळी घेत बुमराने आपला फॉर्म दाखवून दिला आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी बुमराचा धसकाच घेतला आहे. पण, तोच बुमरा ॲडलेड कसोटीत पहिल्या डावांत गोलंदाजी करताना काहीसा अडखळलेला दिसला. शनिवारी दोनदा त्याने फिजीओचीही मदत घेतली. त्यामुळे बुमराला कुठली दुखापत आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण, भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी बुमराविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. (Jasprit Bumrah Injury Update)

(हेही वाचा- Uttar Pradesh सरकारने उतरवले २००० मशि‍दींवरील भोंगे; मौलानांचे सरकारवर आरोप)

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरू असताना ८१ व्या षटकात बुमराने मैदानावरच उपचार करून घेतले होते. पण, मॉर्केल यांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर गोलंदाजी करून तो थकला होता. त्याच्या पायात गोळे येत होते. बाकी काहीही गंभीर नसल्याचा दिलासा मॉर्केल यांनी कसोटीनंतर दिला आहे. (Jasprit Bumrah Injury Update)

‘बुमराची प्रकृती ठणठणीत आहे. त्याने पहिल्या डावांत दिवसभरात २३ षटकं टाकली. त्याचा परिणाम म्हणून त्याला पायात गोळे आले होते. पण, मैदानावरच उपचार घेऊनही त्याने पुढे काही षटकं टाकलीच. त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही. तो बरा आहे,’ असं मॉर्नी मॉर्केल यांनी सांगितलं. बुमराने पहिल्या डावात सलामीवीर उस्मान ख्वाजा, मॅकस्विनी, पॅट कमिन्स आणि स्टिव्ह स्मिथ यांना स्वस्तात बाद केलं. त्यामुळेच भारताने काही काळ कसोटीत पुनरागमन केलं होतं. पण, ट्रेव्हिस हेडने १४१ चेंडूंत १४० धावा करत ही कसोटी भारतापासून दूर नेली. (Jasprit Bumrah Injury Update)

(हेही वाचा- CM Devendra Fadnavis यांनी पूर्ण केले ८ वर्षापूर्वीचे वचन; कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला लावली उपस्थिती)

या मालिकेत आतापर्यंत बुमरा ऑस्ट्रेलियासाठी त्रासदायक ठरला आहे. पर्थ कसोटीतही त्यानेच भारताला विजय मिळवून दिला. पण, डावखुरा ट्रेव्हिस हेडला बाद करण्याचं कसब अजून एकाही भारतीय गोलंदाजाला साधलेलं नाही. ॲडलेड कसोटीही त्यानेच फिरवली. अर्थात, बुमराला कुठलीही दुखापत झालेली नाही, ही भारतासाठी समाधानाची गोष्ट आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेनला सुरू होणार आहे. (Jasprit Bumrah Injury Update)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.