Rahul Narvekar पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान !

198
Rahul Narvekar पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान !
Rahul Narvekar पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान !

विधानसभा अध्यक्षपदासाठी (Assembly Speaker) महायुतीकडून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा एकमेव अर्ज विधिमंडळ सचिवालयाकडे दाखल झाला होता. विरोधकांकडून एकही अर्ज न झाल्याने नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, गेली अडीच वर्ष नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा कारभार सांभाळल्याने पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आली आहे.

बिनविरोध निवड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. यानंतर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा केली. यानंतर राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची बिनविरोध विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. राहुल नार्वेकर यांच्या निवडीनंतर आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

कोण आहेत राहुल नार्वेकर ?
राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे वकील असून त्यांनी शिवसेनेतून राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली. राहुल नार्वेकरांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. यानंतर आता झालेल्या २०२४ च्या निवडणुकीत देखील ते याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ते विजयी झाले. राहुल नार्वेकर हे २०२२ मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यावेळी त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती होते. त्यामुळे एकाचवेळी सासरे आणि जावई विधिमंडळाच्या दोन सभागृहांचे पीठासीन अधिकारी म्हणून कार्यरत होते. सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली आहे. (Rahul Narvekar)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर भाजपने विधानसभा अध्यक्षपदावर दावा करत त्याची जबाबदारी राहुल नार्वेकरांकडे दिली. यानंतर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद जाणार आहे. यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद केली जाणार आहे. (Rahul Narvekar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.