‘नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार’; Devendra Fadnavis असं का म्हणाले ?

226
'नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार'; Devendra Fadnavis असं का म्हणाले ?
'नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार'; Devendra Fadnavis असं का म्हणाले ?

विधानसभेच्या अध्यक्षपदी (Maharashtra Vidhan Sabha Speaker) पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा- Rahul Narvekar पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान !

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “मुंबईमध्ये जन्माला आलेले राहुल नार्वेकर हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील. जे पहिल्याच टर्ममध्ये (पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर) अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले. खरंतर पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान आजवर चारच लोकांना मिळाला आहे. ज्यामध्ये कुंदनमल फिरोदिया, सयाजी सीलम, बाळासाहेब भारदे आहेत आणि त्यानंतर राहुल नार्वेकर आहेत. कुंदनलाल फिरोदिया आणि सयाजी सीलम हे मुंबई राज्याचे अध्यक्ष होते. सयाजी सीलम दुसऱ्यांदा जेव्हा अध्यक्ष झाले, तेव्हा महाराष्ट्र राज्याचे झाले.”

हेही वाचा-Cyber Crime : आता सायबर गुन्हेगारांकडून राज्यपालपद मिळवून देण्याचेही आमीष; एकाची कोट्यवधी रुपयांना फसवणूक

“राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड झाली, मी तमाम विधानसभा सदस्यांच्या वतीने आणि राज्याच्या 12 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. विरोधी पक्षाचे आभार मानतो, काही अपवाद वगळता अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा आहे, त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला विरोधी पक्षाच्या सदस्यांचे आणि गटनेत्यांचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. खरं म्हणजे अध्यक्ष महोदयांनी मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं, पण तरीही आपण परत आलात याचा मला मनापासून आनंद आहे.” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)

हेही वाचा-Delhi Schools Bomb Threat: दिल्लीतील ४० शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, केली ‘ही’ मागणी

नाना पटोलेंचा (Nana Patole) उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री होते. त्यातला एक वकील होता. तुमच्यासारखा निष्णात वकील अध्यक्षांच्या खुर्चीत बसला. या खुर्चीला तुम्ही न्याय द्याल शंका नाही. 11 फेब्रुवारी 1977 मुंबईत जन्माला आलेले राहुल नार्वेकरजी हे कदाचित पहिले अध्यक्ष पहिल्याच टर्मममध्ये अध्यक्ष आणि दुसऱ्यांदा सलग अध्यक्ष झाले. नानाभाऊ (नाना पटोले) तुमचेही आभार…तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे राहुल नार्वेकर पुन्हा अध्यक्ष होऊ शकले.” (Devendra Fadnavis)

हेही वाचा-CM Devendra Fadnavis यांनी पूर्ण केले ८ वर्षापूर्वीचे वचन; कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला लावली उपस्थिती

“राहुल नार्वेकरांना विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाली, तिकडे काम करताना चुणूक दाखवली. कायद्यातील बारकावे शोधून काढून, त्यावर बोट ठेवण्याचे काम करायचे. कायदेमंडळाचे ते अध्यक्ष आहे, त्याला कायद्याचे बारकावे माहिती असणे महत्त्वाची गोष्ट आहे. गेली 5 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणातील संक्रमण काळ होता, पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांकडे मीडियाचं आणि जनतेचं लक्ष होतं. कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक चर्चेत असणारे अध्यक्ष राहुल नार्वेकर होते. त्यांच्या रुपाने न्यायप्रिय अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व निवडलं गेलंय. ही आनंदाची गोष्ट आहे.” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. (Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.