Meteor Shower : खगोलप्रेमींसाठी पर्वणी; 13 व 14 डिसेंबरला अनुभवता येईल उल्कावर्षाव

68
Meteor Shower : खगोलप्रेमींसाठी पर्वणी; 13 व 14 डिसेंबरला अनुभवता येईल उल्कावर्षाव

आगामी १३ व १४ डिसेंबरच्या रात्री आकाशात पूर्व दिशेला उल्कावर्षाव (Meteor Shower) होताना दिसेल. याला जेमिनिड्चा उल्कावर्षाव म्हणतात. हा लघुग्रह व ३२०० फेथॉन नावाच्या छोट्याशा खगोलीय वस्तूंमुळे तयार होतो. ही वस्तू धुमकेतू व लघुग्रह यामधली एक मानली जाते. हा उल्कावर्षाव खगोलप्रेमी व अभ्यासकांना साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.

(हेही वाचा – ईव्हीएमवर शंका असल्यास खासदारांनी राजीनामा द्यावा; Navneet Rana यांचा विरोधकांवर निशाणा)

अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करीत असताना क्षणार्धात एखादी प्रकाशरेषा चमकून जाताना आपण पाहतो. या घटनेस ‘तारा तुटला’ असे म्हटले जाते; परंतु तारा कधीही तुटत नाही. ही एक खगोलीय घटना आहे व यालाच ‘उल्कावर्षाव’ (Meteor Shower) म्हणतात. उल्काचे निरीक्षण व शास्त्रीय नोंदी याची खगोल जगतात खूप गरज आहे. त्यामुळे बाह्य अवकाशातील वस्तूचे नमुने या उल्केमुळे आपणास मिळतात व यामुळे वस्तूच्या जडणघडणेचा अर्थ लावता येतो.

(हेही वाचा – Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीने अखेर जनतेचा कौल केला मान्य!)

या उल्कावर्षावाचे (Meteor Shower) विलोभनीय दृश्य अवश्य बघावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी केले आहे. हे तर धुमकेतू, लघुग्रहाचे अवशेष जेमिनिड्स उल्कावर्षाव हा ३२०० फेथॉन नावाच्या एका छोट्या खगोलीय वस्तूमुळे होतो. ही वस्तू धूमकेतू आणि लघुग्रह यांच्यामधील एक प्रकार मानली जाते. धुमकेतू किंवा लघुग्रह सूर्याला प्रदक्षिणा मारत असताना त्यातील काही भाग मोकळा होतो. हे त्यांचे अवशेष आहेत. याबाबत काही अंधश्रद्धा असल्या तरी याला खगोलशास्त्रात कुठेही थारा नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.