Crime : पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचा मेसेज करणाऱ्याला अजमेर येथून अटक

96
Crime : दाऊद टोळीतील दानिश चिकनाला डोंगरी येथून ड्रग्ज प्रकरणात अटक
  • प्रतिनिधी

मुंबई वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखल्याचा धमकीचा मेसेज टाकणाऱ्या एकाला राजस्थानमधील अजमेर येथून अटक करण्यात आली आहे. मोहम्मद बेग मिर्झा असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून मालकाने कामावरून काढल्यामुळे नैराश्याच्या भरात त्याने धमकीचा मेसेज केल्याचे कबूल केले आहे. मिर्झा हा एका खाजगी कंपनीत टर्नर म्हणून नोकरीला होता. काही दिवसांपूर्वी मालकसोबत झालेल्या भांडणानंतर मालकाने त्याला नोकरीवरून काढून टाकले होते. त्यानंतर त्याने नैराश्यातून आणि मद्यधुंद अवस्थेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असलेला संदेश टाईप करून वाहतूक पोलिस हेल्पलाईन नियंत्रण क्रमांकावर पाठवला होता. त्यात मिर्झाने आपल्या मालकाचे नाव धमकीच्या संदेशात समाविष्ट केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Crime)

(हेही वाचा – ‘मेक इन इंडिया’पाठोपाठ Wed In India देणार पर्यटनाच्या अर्थव्यवस्थेला बळ; पंतप्रधानांनी दिला तरुणांना सल्ला)

मुंबई वाहतूक पोलीस विभागाच्या हेल्पलाईन व्हॉट्सॲप क्रमांकावर शनिवारी, पहाटे २ वाजता, एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेसेज प्राप्त झाला होता. या मेसेजमध्ये देशाचे पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा करण्यात आला. काही व्यक्ती मुंबई आणि धनबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा आणि भारतीय लष्कराला कमकुवत करण्याचा कट रचत असल्याचा दावाही या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. शिवाय, संशयितांपैकी एक पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Crime)

(हेही वाचा – I.N.D.I. Alliance मध्ये नेतृत्वावरून कलह)

मेसेजमध्ये एका कंपनीत बेकायदेशीर शस्त्रास्त्रे तयार करण्यात आणि पंतप्रधान आणि लष्कराला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांचा उल्लेख आहे. या मेसेजमध्ये प्रिन्स खान आणि इरफान रझादिया या दोन व्यक्तींची नावे टाकण्यात आली होती. मेसेज करणाऱ्याने दावा केला की, दोघांपैकी एकाने धनबादमध्ये आणि दुसऱ्याने मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखली होती. त्यात इरफान नावाच्या व्यक्तीशी जोडलेला मोबाईल क्रमांकही होता. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ तपास सुरू करून मोबाईल क्रमांक राजस्थान येथील अजमेर येते ट्रेस करण्यात आला. पोलीस पथक अजमेर येथे रवाना झाले आणि अजमेर येथून मोहम्मद बेग मिर्झा याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत मालकाला अद्दल घडविण्यासाठी हे कृत्य केल्याचे कबूल केले. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.