बांगलादेशात (Bangladesh) हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. हे हल्ले थांबवण्यासाठी तेथील युनूस सरकार काहीही प्रयत्न करत नाही. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करण्यात यावे, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मुंबईसह राज्यभर ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले.
(हेही वाचा कर्नाटकातील काँग्रेस सरकार विधानसभा सभागृहातून काढणार Veer Savarkar यांची प्रतिमा; भाजपाकडून निषेध)
शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून मुंबईतील घाटकोपर, नवी मुंबई, ठाणे, नाशिक या ठिकाणी हे मोर्चे काढण्यात आले. बांगलादेशात (Bangladesh) ज्याप्रकारे हिंदूंची लोकसंख्या ३३ टक्क्यांवरून कमी होऊ ८ टक्क्यांवर आली आहे. तसेच तेथील अंतरिम पंतप्रधान महमंद युनूस यांच्या जो पुरस्कार देण्यात आला आहे, तो रद्द करण्यात यावा. तसेच बांगलादेशातील हिंदू महिलांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यात यावे, तेथील हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले थांबवण्यात यावेत, या सर्व मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाकडून मोर्चे काढण्यात आले.
Join Our WhatsApp Community