- विशेष प्रतिनिधी, मुंबई
विक्रोळीतील भूखंडावर असलेल्या मनोरंजन मैदानाच्या जागेवर मुस्लिम मृत व्यक्तींना दफन करण्यासाठी स्मशानभूमी करता (कब्रस्तान) आरक्षित करण्याचा प्रस्ताव अखेर महापालिकेच्यावतीने रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कब्रस्तान आणि रुग्णालय अशाप्रकारचे सुधारित आरक्षण रद्द करून पुन्हा जुनेच मनोरंजन मैदान असे आरक्षण कायम ठेवण्यात येत आहे. महापालिकेच्या एन विभागातील नगर भू क्रमांक ५० वर विक्रोळीतील भूखंडावर मनोरंजन मैदानाचे आरक्षण होते. हे आरक्षण बदलून स्मशानभूमी अर्थात कब्रस्तान आणि रुग्णालय असे सुधारित आरक्षण टाकण्यात आले होते. याठिकाणी कब्रस्तान असून मनोरंजन मैदानासाठी आरक्षित जागेवर विस्तारीत कब्रस्तान बनवण्याची मागणी स्थानिकांनी केल्यामुळे स्थानिक भाजपाचे आमदार राम कदम यांच्या शिफारशीनुसार हे सुधारित आरक्षण टाकण्यात आले होते. परंतु याबाबत हरकती व सूचनांसाठी महापालिकेने नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर स्थानिकांच्या लक्षात ही बाब आणि याला स्थानिकांनी जोरदार विरोध केला. (Muslim Cemetery)
(हेही वाचा – World Chess Championship : १२ वा डाव जिंकून डिंग लिरेनची गुकेशशी बरोबरी, आता फक्त २ डाव बाकी)
या मनोरंजन मैदानाच्या जागेवर महापालिकेच्यावतीने मियावकी पद्धतीने झाडांची लागवड केलेली असताना याठिकाणी मुस्लिम स्मशानभूमी बनवण्याचा प्रयत्न झाल्याने याला स्थानिकांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे याबाबत मागवलेल्या हरकती व सूचनांमध्ये ६५ हून अधिक हरकती व सूचना प्राप्त झाल्या. ज्या तत्कालिन खासदार मनोज कोटक, आमदार पराग शहा, स्थानिक आमदार राम कदम यांच्यासह आसपासच्या गृहनिर्माण संस्थांनी आरक्षण बदलास आक्षेप नोंदवला. त्यातच याबाबत उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेमध्ये मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या कांजूर पूर्व या भूखंडावरील सध्या रिकाम्या असलेल्या सुमारे २८११ चौरस मीटरचा भूभाग महापालिकेला हस्तांतरीत करण्याबाबत कळवले आहे. त्यानसुसार महापालिकेला हा भूखंड हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याने महापालिकेने विक्रोळी येथील मनोरंजन मैदानाकरता आरक्षित असलेल्या भूखंडावर स्मशानभूमी आणि रुग्णालय बांधण्याच्या सुधारित आरक्षणाचा प्रस्ताव रद्द करुन जुनेच म्हणजे मनोरंजन मैदानाच्या जागेचे आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. (Muslim Cemetery)
(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध; Eknath Shinde यांनी केला हल्लाबोल)
या जागेवरील जुने आरक्षण कायम ठेवण्यासाठी सखल हिंदु समाजाचे विभागातीने नेते करणसिंह यांनी जोरदार लोकआंदोलन केले होते. याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी महापालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. महापालिकेने स्मशानभूमीचे सुधारित आरक्षण रद्द करून जुनेच मनोरंजन मैदानाचे आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतल्याने हा एकप्रकार विभागातील जनतेचा विजय आहे. याचा प्रस्ताव रद्द झाल्याने विभागातील जनता खुश असून या लढा यशस्वी करून महापालिकेला आपला प्रस्ताव रद्द करण्याची वेळ आणल्याबद्दल त्यांनी स्थानिक नागरिकांचे आभार मानले आहे. (Muslim Cemetery)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community