BEST बसचा भीषण अपघात; १० ते १२ जणांना भरधाव वेगात असणाऱ्या बसने चिरडले

426
BEST बसचा भीषण अपघात; १० ते १२ जणांना भरधाव वेगात असणाऱ्या बसने चिरडले
BEST बसचा भीषण अपघात; १० ते १२ जणांना भरधाव वेगात असणाऱ्या बसने चिरडले

मुंबईत (Mumbai) अपघाताची मोठी घटना घडली आहे. कुर्ला एलबीएस रोडवर मोठा अपघात झाला आहे. एसी बेस्ट बसने अनेकांना उडवल्याची माहिती आहे. कुर्ला पश्चिम (Kurla West) रेल्वे स्टेशन रोड वरील आंबेडकर नगर येथे बेस्टचा झालेल्या या अपघातात १५ ते २० जणांना बसने चिरडले आहे. त्यात ४ते ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वृत्तसंस्थांकडून दिला जात आहे. (BEST) तरी या अपघातानंतर अनेक जण रस्त्यावर उतरले आहेत. कुर्ला डेपोपासून स्टेशनपर्यंत संपूर्ण रोड बंद करण्यात आलेला आहे. जखमींना बाहेर काढले जात आहे.

( हेही वाचा : Swatantryaveer Savarkar यांच्या प्रतिमेबाबत काँग्रेस सरकारने घेतलेल्या भूमिकेचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून निषेध

दरम्यान अपघातातील जखमींना सायन आणि कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.एलबीएस रोड हा अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे. तिथे मार्केटसुद्धा आहे. असं असताना या परिसरात भरधाव बस चालवण्यात आली. भरधाव बेस्टने अनेक वाहनांना धडक दिली आहे. बेस्ट बसने दिलेल्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झालेला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बसचा चालक हा मद्यधुंत अवस्थेत होता.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून चौकशी सुरु झाली आहे. बेस्ट चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(BEST) तर काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.