महाराष्ट्रात विरोधकांमधील एकाही पक्षाला २९ जागा मिळू न शकल्याने विधानसभेला विरोधी पक्षनेता (Opposition Leader) मिळणार की नाही, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या महाविकास आघाडीचा (MVA) धुव्वा उडाला आणि या आघाडीतील तीन प्रमुख पक्षांना मिळून केवळ ४६ जागा जिंकता आल्या. दिल्लीत केजरीवाल सरकारने भाजपला तीन आमदार असूनही विरोधी पक्षनेतेपद दिले होते. तसेच, महाराष्ट्रातही होईल का? राज्यात विरोधी पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नसताना त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल का, याची चर्चा सुरू झाली आहे. (Opposition Leader)
नियम काय सांगतो ?
महाराष्ट्राच्या विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फक्त 10 आमदार आहेत. त्यानंतरही विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी विरोधकांनी केलीय. शिवसेना(उबाठा) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून नियमही जाणून घेतले आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी एकूण आमदारांच्या संख्येच्या तुलनेत 10 टक्के संख्या आवश्यक असते. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान 29 आमदार असणं आवश्यक आहे. पण, महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षाकडे एवढं संख्याबळ नाही. (Opposition Leader)
महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद द्यायचं की नाही हा सर्वस्वी अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी (8 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेत विरोधी पक्षनेतेपद देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे राज्यात ‘दिल्ली पॅटर्न’ लागू होऊन विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी आशा मविआला आहे. याबाबतचा अधिकृत निर्णयापूर्वी महाविकास आघाडीत यावरुन मतभेद सुरु झाल्याची माहिती आहे. (Opposition Leader)
विरोधी पक्षनेतेपदावरुन मविआत मतभेद
विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे राहावं अशी भूमिका काँग्रेसने (Congress) घेतली आहे. आता भाजपचे नेते महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद देणार का? त्यांनी हे पद देण्याचा निर्णय दिला तर महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेता कोण होणार? हे पाहावं लागणार आहे. (Opposition Leader)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community