
केंद्र सरकार (Central Govt) संसदेच्या चालू अधिवेशनातच ‘वन नेशन-वन इलेक्शन’ (One Nation, One Election) विधेयक मांडू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारला या विधेयकावर एकमत हवे आहे, त्यामुळे हे विधेयक संसदेकडून संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) चर्चेसाठी पाठवले जाईल. जेपीसी या विधेयकावर सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करेल. याशिवाय सर्व राज्यांच्या विधानसभांचे स्पीकर आणि देशभरातील विचारवंत आणि इतर भागधारकांनाही या प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. सर्वसामान्यांचेही मत घेतले जाईल. (One Nation, One Election)
हेही वाचा- Punjab News : भारतीय हद्दीत घुसलेला पाकिस्तानी घुसखोर ठार; पाकिस्तानने मागितला नाही मृतदेह
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या नेतृत्वाखालील उच्च-स्तरीय समितीच्या ‘एक देश, एक निवडणूक’ या अहवालाला मंत्रिमंडळाने आधीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे विधेयक आताच्या अधिवेशनात चर्चेला येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर 39 राजकीय पक्ष, अर्थतज्ज्ञ आणि निवडणूक आयोगाशीही चर्चा केलीय. या सर्व चर्चेनंतर या समितीनं जवळपास 18,000 पानांचा अहवाल सादर केलाय. (One Nation, One Election)
वन नेशन वन इलेक्शनचा विचार करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 2 सप्टेंबर 2023 रोजी एक पॅनेल तयार करण्यात आले. या पॅनलने भागधारक-तज्ञांशी चर्चा केल्यानंतर आणि 191 दिवसांच्या संशोधनानंतर 14 मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अहवाल सादर केला होता. (One Nation, One Election)
कोविंद पॅनेलच्या शिफारशीत 5 सूचना… (One Nation, One Election)
- सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच 2029 पर्यंत वाढवण्यात यावा.
त्रिशंकू विधानसभा (कोणाकडेही बहुमत नाही) आणि अविश्वास प्रस्ताव आल्यास, उर्वरित 5 वर्षांच्या कालावधीसाठी नव्याने निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. - पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 100 दिवसांत होऊ शकतात.
- लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून निवडणूक आयोग एकच मतदार यादी आणि मतदार ओळखपत्र तयार करेल.
- कोविंद पॅनेलने एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी उपकरणे, मनुष्यबळ आणि सुरक्षा दलांचे आगाऊ नियोजन करण्याची शिफारस केली आहे.
-
वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय? (One Nation, One Election)
सध्या भारतात, राज्यातील विधानसभा निवडणुका आणि देशातील लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. म्हणजेच लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांचे सदस्य निवडण्यासाठी मतदार एकाच दिवशी, एकाच वेळी किंवा टप्प्याटप्प्याने मतदान करतील. (One Nation, One Election)
स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या, परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे एक देश, एक निवडणुकीची परंपरा खंडित झाली. (One Nation, One Election)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community