Border – Gavaskar Trophy, Adelaide Test : मोहम्मद सिराजला दंड आणि ट्रेव्हिस हेडला फक्त समज असं का?

ॲडलेड कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सिराज आणि हेड यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती.

78
Border - Gavaskar Trophy, Adelaide Test : मोहम्मद सिराजला दंड आणि ट्रेव्हिस हेडला फक्त समज असं का?
Border - Gavaskar Trophy, Adelaide Test : मोहम्मद सिराजला दंड आणि ट्रेव्हिस हेडला फक्त समज असं का?
  • ऋजुता लुकतुके

ॲडलेड कसोटीत (Adelaide Test) भारताचा मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड (Travis Head) यांच्यात उडालेल्या शाब्दिक चकमकीची दखल अखेर आयसीसीनेही घेतली आहे. आणि खेळाडूंच्या वर्तणुकीसाठी असलेलल्या आचारसंहितेचा हा भंग असल्याचा ठपका ठेवत दोघांवर कारवाई केली आहे. मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) सामन्यासाठीच्या शुल्कातून २० टक्के कापण्यात येणार आहे. तर हेडला त्याच्या शेरेबाजीसाठी समज देण्यात आली आहे. (Border – Gavaskar Trophy)

‘आयसीसीच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचारसंहितेच्या कलम २.५ नुसार, मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) २० टक्के दंड आणि ट्रेव्हिस हेडला (Travis Head) समज देण्यात येत आहे. शिवाय दोन्ही खेळाडूंना एक डिमेरिट गुण देण्यात येत आहे. म्हणजेच या हंगामातील दोघांचा हा पहिला गुन्हा आहे,’ असं आयसीसीने (ICC) आपल्या निकालात म्हटलं आहे. दोघांनाही एकच कलम लावलेलं असताना सिराजला दंड आणि हेडला फक्त समज असं का झालं, असा प्रश्न तुम्हाला पडलेला असू शकतो. असं का झालं ते समजून घेऊया,

(हेही वाचा – Kurla Bus Accident : बसचे ब्रेक फेल नाहीत; कुर्ला अपघात प्रकरणी पोलिसांचा दावा)

खेळाडू आचारसंहितेचं २.५ हे कलम एखादा बळी मिळवल्यावर मैदानात आनंद साजरा करण्याबद्दल आहे. बळी गेल्यानंतर कुठल्याही खेळाडूचं वर्तन, हावभाव कसं असावं याविषयीचा हा नियम आहे. खेळाडूचं वागणं, हावभाव आणि बोलणं हे समोरच्या खेळाडूचा अपमान करणारं नसावं असं या नियमात म्हटलं आहे. तो प्रसंग बघितला तर त्यातून सिराजने शाब्दिक चकमकीबरोबरच संतप्त हावभावही केल्याचं दिसतंय. याउलट ट्रेव्हिस हेडने (Travis Head) अपशब्द वापरलेलं दिसत आहे. त्यामुळे त्याबद्दल त्याला समज देण्यात आली आहे. तर मोहम्मद सिराजला चकमक आणि हावभावांसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. (Border – Gavaskar Trophy)

दोन्ही खेळाडूंनी आपापले गुन्हे मान्य केले आहेत. त्यामुळे अधिक सुनावणीची गरज नसल्याचं आयसीसीने म्हटलं आहे.

ॲडलेड कसोटीत (Adelaide Test) नेमकं काय घडलं होतं ते समजून घेऊया, ट्रेव्हिस हेडने (Travis Head) १४१ चेंडूंत १४० धावा केल्यानंतर सिराजने एका यॉर्कर चेंडूवर हेडला बाद केलं. सिराज आपला आनंद साजरा करत असतानाच हेड त्याला काहीतरी बोलताना दिसला. आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. रोहित, विराट आणि बुमराह सिराजला शांत करताना दिसले. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत, हेडने म्हटलं की, ‘मी त्याला चांगला चेंडू होता, असं म्हटलं फक्त.’ पण, सिराजने हरभजन सिंगशी बोलताना सांगितलं की, ‘हेड खोटं बोलत होता. त्याने अपशब्द वापरला म्हणूनच मी चिडलो.’

ऑस्ट्रेलियाने या कसोटीत भारताचा १० गडी राखून पराभव केला. मालिकेत आता १-१ अशी बरोबरी आहे. आणि तिसरी कसोटी १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन इथं होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.