-
ऋजुता लुकतुके
भारतात महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ही साधारणपणे प्रगत राज्य मानली जातात. शिक्षणाच्या, नोकरीच्या संधी, औद्योगिक विकास, सामाजिक एकोपा, असे आर्थिक, सामाजिक निकष यासाठी लावले आहेत. तर ईशान्येकडील ७ राज्ये ही आर्थिक दृष्ट्या मागासलेली आहेत. आता आधुनिक पद्धतीत राज्यातील लोकांचं दरडोई उत्पन्न तसंच राज्याचा देशाच्या जीडीपीतील वाटा असे दोन ठोस निकष वापरले जातात. त्यानुसार, भारतीय राज्यांमध्ये कुठलं राज्य प्रगत आहे ते बघूया,
मागच्या काही वर्षांत भारत देश हा माहिती तंत्रज्जान क्षेत्रात प्रगती करत असताना त्यातील मोठा वाटा दक्षिणेकडील कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि केरळ या राज्यांनी उचलला आहे. देशाच्या एकूण जीडीपीत या राज्यांचा वाटा तब्बल ३० टक्के इतका आहे. (Richest State in India)
(हेही वाचा – Kurla Bus Accident : बसचे ब्रेक फेल नाहीत; कुर्ला अपघात प्रकरणी पोलिसांचा दावा)
पण, जीडीपीमधील हिस्सेदारीत अजूनही महाराष्ट्र हे राज्यच अव्वल आहे. महाराष्ट्राची जीडीपीतील हिस्सेदारी मात्र १५ टक्क्यांवरून १३.९ टक्क्यांवर घसरली आहे. १९६०-६१ पर्यंत देशाच्या जीडीपीत सगळ्यात जास्त वाटा उचलणारं पश्चिम बंगाल राज्य मात्र १०.५ टक्क्यांवरून आता ५ टक्क्यांवर घसरलं आहे. (Richest State in India)
जीडीपीमध्ये राज्यांचा वाटा
महाराष्ट्र – १३.३%
तामिळनाडू – ८.९० %
कर्नाटक – ८.२०%
गुजरात – ८.१०%
उत्तर प्रदेश – ७.७०%
तर दरडोई उत्पन्नाचा निकष लावला तर दक्षिणेकडील राज्य यात आघाडीवर दिसतील.
तेलंगाणा – १७६.८%
दिल्ली – १६७.५%
हरयाणा – १७६.८%
महाराष्ट्र – १५०.७%
उत्तराखंड – १४५.५%
यातील टक्केवारी ही देशाच्या एकूण दरडोई उत्पन्नाची टक्केवारी आहे. ही आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी विभागाने सादर केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community