Border – Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेड पराभवानंतर रोहित शर्मावरच का होतेय टीका?

रोहितचा फॉर्म आणि कप्तानी अशा दोन्हीवर ही टीका होतेय.

121
Boxing Day Test : रोहित शर्मा मेलबर्नला सलामीलाच येणार, राहुल तिसऱ्या क्रमांकावर
Boxing Day Test : रोहित शर्मा मेलबर्नला सलामीलाच येणार, राहुल तिसऱ्या क्रमांकावर
  • ऋजुता लुकतुके

भारतीय कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) फॉर्म सध्या खराब आहे. आणि त्यातच ॲडलेड कसोटीतील संघाच्या दारुण पराभवानंतर रोहितच्या कप्तानीवरही टीका होत आहे. खमकेपणा दाखवण्यात रोहित कमी पडला, असं मत काही माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं आहे. पर्थमधील पहिल्या कसोटीच्या वेळी रोहित सुट्टीवर होता. ॲडलेडमध्ये तो संघात परतला तेव्हा दोन्ही डावांत त्याच्या धावा होत्या ३ आणि ६. रोहित शर्मा (Rohit Sharma) या कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पर्थ कसोटीत प्रभावी ठरलेल्या के एल राहुलला (KL Rahul) त्याने सलामीला पुन्हा एकदा संधी दिली. या निर्णयासह त्याच्या इतरही काही निर्णयावर आता शंका उपस्थित केली जात आहे. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)

माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहितने पुन्हा सलामीलाच खेळावं असं मत व्यक्त केलं आहे. ‘रोहित सलामीला खेळला तर आक्रमक सुरूवात संघाला करून देऊ शकेल. आणि त्याचा फायदा येणाऱ्या फलंदाजांना होईल. ॲडलेडमध्ये त्याची देहबोली काहीशी नरम गरम वाटली. त्याने स्वत:ला जखडून ठेवलं होतं. त्यापेक्षा तो सलामीला आलेलाच बरा,’ असं शास्त्री आयसीसी रिव्ह्यू या कार्यक्रमात म्हणाले. (Border – Gavaskar Trophy, Adelaide Test)

(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy, Adelaide Test : मोहम्मद सिराजला दंड आणि ट्रेव्हिस हेडला फक्त समज असं का?)

तर माजी सलामीवीर आकाश चोप्राने रोहितच्या कप्तानीवर टीका केली आहे. ‘जे चुकलं, ते दाखवून द्यायलाच हवं. रोहित खूप बचावात्मक खेळला आणि त्याचं नेतृत्वही बचावात्मक होतं. सामन्यात वर्चस्वाचे क्षण आले ते त्याने तसेच जाऊ दिले. त्यामुळे संघाचं संतुलन आणि लय बिघडली,’ असं आकाश चोप्राने बोलून दाखवलं.

रोहित शर्मानेही (Rohit Sharma) सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत फलंदाजांचं अपयश मान्य केलं. ‘पहिल्या डावांत १८० धावा केल्या तिथेच आम्ही कमी पडलो. त्या मैदानावर ही धावसंख्या अपुरीच होती,’ असं रोहितने (Rohit Sharma) म्हटलं. तर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही रोहितला काही सल्ले दिले आहेत. रोहितने सलामीलाच खेळावं, असं गावसकर यांचं म्हणणं आहे. ‘रोहित सलामीला आला आणि त्याने सुरुवातीला २०-३० धावा केल्या तरी तो मोठा खेळाडू आहे. या धावा शतकात कशा बदलायच्या हे तो जाणतो. सलामीला येऊन कुणीतरी शतक करावं हेच तर भारताला हवं आहे. ती क्षमता रोहितकडे आहे,’ असं गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले आहेत.

फलंदाजांनी आपलं तंत्र बदलून काही चुकीचे फटके खेळणं थांबवावं असा सल्लाही गावसकर यांनी दिला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.