पराक्रमी भारतीय राजांच्या इतिहासाला अधिक महत्व!
यूजीसीने इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा नवीन आराखडा तयार केला आहे. यामध्ये भारतावर आक्रमणे करणारे, हिंदूंची मंदिरे उद्धवस्थ करणारे, हिंदूंचा वंशविच्छेद करणारे, हिंदू महिलांवर अत्याचार करणारे आणि हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मुसलमान आक्रमकांऐवजी भारतीय राजांचा पराक्रमी इतिहास, त्यांच्या गौरवशाली इतिहासावर अधिक प्रकाश टाकण्यात येणार आहे. ‘हिस्ट्री ऑफ इंडिया (इसवी सन १२०६ ते १७०७)’ अंतर्गत सांगण्यात येणाऱ्या इतिहासामध्ये आता अकबर आणि मुघलांऐवजी राणा प्रताप आणि हेमू विक्रमादित्य या हिंदू राज्यकर्त्यांचा पराक्रम अधोरेखित करण्यात येणार आहे.
वेद, उपनिषदे आणि धार्मिक ज्ञान देणार!
‘आयडिया ऑफ भारत’मध्ये भारतातील राजकीय बाबींऐवजी नव्या अभ्यासक्रमामध्ये धार्मिक बाबींवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर नवीन प्रस्तावित अभ्यासक्रम असणार आहे. या माध्यमातून पदवीपूर्वी विद्यार्थ्यांना धर्मांसंदर्भातील ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्राचीन भारतामधील विज्ञान आणि तंत्रज्ञानासंदर्भातील माहितीही या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केली जाणार आहे. वैदिक काळातील भारत कसा होता, वेद आणि उपनिषदे यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community