तेलंगाना हायकोर्टाने दि. ९ डिसेंबर रोजी एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. माजी बीआरएस आमदार चेन्नमनेनी रमेशचे नागरिकत्व (Citizenship) रद्द करण्यात आले आहे. त्यांना जर्मन नागरिक घोषित केले. तसेच कोर्टाने त्यांना ३० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. रमेश यांनी जर्मन नागरिकत्व लपवून न्यायापालिका आणि जनतेची दिशाभूल केली. हे पहिल्यांदा झाले आहे की, देशातील माजी आमदाराचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात आले आहे.
( हेही वाचा : Durgadi Fort : हिंदूंच्या प्रदीर्घ लढ्याला यश; कल्याणमधील दुर्गाडी हे देवीचे मंदिरच; न्यायालयाचा निर्वाळा)
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती बी. विजयसेन रेड्डी यांनी आपल्या सुनावणीत सांगितले की, चेन्नमनेनी रमेश (Chennamaneni Ramesh) यांनी २००९ पासून भारतीय नागरिक असल्याचा दावा करत निवडणुक लढवली. परंतु ते जर्मन नागरिक आहेत. गृह मंत्रालयाने पहिलेच त्यांचे भारतीय नागरिकत्व (Citizenship) रद्द केली आहे. हायकोर्टाने मंत्रालयाच्या निर्णयाला योग्य ठरवले.
चेन्नमनेनी रमेश यांनी १९९० मध्ये जर्मन नागरिकत्व (Citizenship) मिळवले. त्यांनी तिथे लग्न केले, कुटुंबियांसह जीवन व्यथित केले. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळवल्याचा दावा केला. मात्र गृहमंत्रालयाच्या तपासात कळले की, रमेश (Chennamaneni Ramesh) यांनी आपले जर्मन नागरिकत्व सोडलेले नाही. त्यांचा जर्मन पासपोर्ट २०२३ पर्यंत वैध आहे.
रमेश (Chennamaneni Ramesh) यांनी २००९ मध्ये तेलुगु देशम पार्टी (Telugu Desam Party) (टीडीपी) मधून पहिल्यांदा आमदारकी मिळवली. त्यानंतर ते बीआरएस (BRS) (तत्कालीन टीआरएस) मध्ये सहभागी झाली. त्यानंतर २०१०, २०१४, २०१९ मध्ये तीन वेळा ते आमदार म्हणून विजयी झाले. रमेश यांच्यासाठी हा निर्णय राजकीय आणि कायदेशीर धक्का आहे. भारतीय संविधान आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार गैर-भारतीय नागरिक निवडणुक लढवू शकत नाही, असे संविधान सांगते. त्यानुसार नागरिकत्वासंदर्भात त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. (Citizenship) (Chennamaneni Ramesh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community