Kurla Best Bus Accident : आरोपी संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

196
Best Undertaking : बेस्ट समितीने नाकारलेल्या संस्थेचा प्रस्ताव प्रशासनाने केला मंजूर; रवी राजा यांचा ओला कंपनीबाबत गंभीर आरोप
  • प्रतिनिधी 

कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातातील आरोपी चालक संजय मोरे याला मंगळवारी कुर्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान मोरे याने मद्यप्राशन केले असल्याचा पोलिसांनी कुठेही उल्लेख केला नसल्यामुळे तो दारूच्या नशेत नव्हता हे स्पष्ट झाले आहे. तसेच बसचे ब्रेक देखील फेल झाले नव्हते, तर अपघाताचे मूळ कारण काय आहे हे शोधण्यासाठी तज्ञ लोकांची मदत घेतली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Kurla Best Bus Accident)

(हेही वाचा – मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी केली १.५ लाख सरकारी नोकऱ्यांची घोषणा)

कुर्ला पश्चिम स. गो. बर्वे मार्गावर सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास एसी बेस्ट बसच्या भीषण अपघात ७ जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण जखमी झाले आहे. मृत पावलेल्यांमध्ये सर्व जण पादचारी होते. कुर्ला रेल्वे स्थानक ते अंधेरी स्थानक येथे जाणारी मार्ग क्र. ३३२ या वातानुकूलित बसचा चालक संजय मोरे याला रात्रीच कुर्ला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी मोरे याची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर मंगळवारी त्याला कुर्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात पोलिसांनी संजय मोरे याने मद्यप्राशन केल्याचे कुठलाही उल्लेख नाही, त्यामुळे मोरे याने मद्यप्राशन केले नसल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाने आरोपी संजय मोरे याला न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Kurla Best Bus Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.