-
ऋजुता लुकतुके
सीआरपीएफ किंवा केंद्रीय राखीव सुरक्षा दल हे देशातील सगळ्यात मोठं केंद्रीय सुरक्षा दल आहे. ते केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं. केंद्रशासित प्रदेशांमध्ये कायदे व सुव्यवस्था राखण्याचं काम हे दल करतं. तर राज्य पोलीस दलांच्या विनंतीनुसार, अतिरिक्त बंदोबस्तासाठीही सीआरपीएफ तुकडीचा वापर केला जातो. याशिवाय देशातील आणीबाणीच्या प्रसंगी, म्हणजे बाहेरून झालेली घुसखोरी, दहशतवादी हल्ले, गर्दीचे प्रसंग, देशांतर्गत दंगे, नैसर्गिक संकटं अशाप्रसंगी लोकांची सुरक्षा आणि हल्ले परतवण्याच्या कामी सीआरपीएफ सगळ्यात पुढे असतं. (CRPF Salary)
(हेही वाचा- Military Voluntary Retirement : केंद्र सरकारची राज्यसभेत धक्कादायक माहिती; ५५ हजार जवानांची ‘स्वेच्छानिवृत्ती’)
अलीकडे लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगानुसार, सीआरपीएफ जवानाला मिळणार मासिक पगार हा रुपये २१,७०० ते रुपये ६९,१०० यांच्या दरम्यानचा आहे. सेवाज्येष्ठता आणि पदोन्नती यावरून तुमचा नेमका पगार ठरतो. तसंच तुमच्या नेमणुकीच्या ठिकाणावरही तो अवलंबून असतो. (CRPF Salary)
तुमच्या मूळ पगाराव्यतिरिक्त तुम्हाला ग्रेड पे, महागाई भत्ता, धरभाडे भत्ता असे भत्तेही मिळत असतात. (CRPF Salary)
नोकरीत ४ वर्षं पूर्ण केलेल्या एका जवानाची मासिक पगाराची पावती पाहूया,
सीआरपीएफ जवानाला मिळणारा पगार (रुपयांमध्ये – ४ वर्षांचा अनुभव) |
|
मूळ पगार |
२९,३०० |
रेशन भत्ता |
३,००० |
जोखीम भत्ता |
९,७०० |
घरभाडे भत्ता |
२,३४४ |
महागाई भत्ता |
२,६३७ |
एकूण पगार |
४७,३७९ |
सरकारी वजावट |
-३,२२४ |
इतर वजावट |
-५६० |
हातात येणारा पगार |
४३,५९५ |
सीआरपीफ दलात काम करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला निवृत्तीवेतनही लागू होतं. ३३ वर्षांची सेवा झाली असेल तर किमान १८,००० रुपयांपासून तुम्हाला मासिक निवृत्तीवेतन मिळू शकतं. या दलात तुम्ही शिपाई पदावर रुजू झालात तरी तुम्हाला पदोन्नतीच्या संधीही मिळतात. ९ वर्षांची सेवा बजावल्यानंतर तुम्ही मुख्य शिपाई होऊ शकता. तर मुख्य शिपाई म्हणून ५ वर्षं सेवा बजावल्यानंतर तुम्ही सहाय्यक निरीक्षकाच्या हाताखाली थेट काम करू शकता. तसंच तिथं ५ वर्षं काम केल्यानंतर सहाय्यक निरीक्षक किंवा निरीक्षक पदासाठीही तुम्ही अर्ज करू शकता. (CRPF Salary)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community