बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायूं कबीर (TMC MLA HUMAYUN KABIR) यांनी मुसलमानबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे २ एकर भूमीवर नवीन बाबरी मशीद बांधणार असल्याची घोषणा केली आहे. ६ डिसेंबर २०२५ च्या आधी बाबरी मशीद (Babri Masjid) बांधण्याचे काम चालू केले जाईल. या मशिदीसाठी मी १ कोटी रुपये दान देणार आहे, असे त्यांनी म्हटले.
(हेही वाचा – Jalna Truck Firing: जालन्यात टोलनाका परिसरात ट्रक चालकावर गोळीबार; नेमकं प्रकरण काय?)
कबीर पुढे म्हणाले की, बंगालमध्ये ३४ टक्के मुसलमान आहेत. त्यांना ताठ मानेने चालण्याची इच्छा आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मशिदीसाठी १०० जणांचे विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात येईल. हुमायून कबीर हे मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यातील भरतपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही होते. 2011 मध्ये त्यांनी पहिल्यांदा टी. एम. सी. च्या तिकिटावर रेजिनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
अलीकडेच हुमायून कबीर (TMC MLA HUMAYUN KABIR) यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांनी सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारात सांगितले होते की, ते जिंकल्यानंतर दोन तासांत भाजप समर्थकांना कापून भागीरथी नदीत फेकून देतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community