-
ऋजुता लुकतुके
बोर्डर – गावसकर मालिकेत आता १-१ अशी बरोबरी आहे. पुढील मुकाबला येत्या शुक्रवारपासून ब्रिस्बेन इथं सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी फलंदाजांच्या कामगिरीबरोबरच भारताला चिंता आहे ती जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीची. ॲडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन डावात ८२ वं षटक सुरू असताना बुमराहने मैदानातच उपचार करून घेतले. त्याने १९ षटकं टाकली. तो दिवस संपल्यावर संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी बुमराची तब्येत बरी असल्याचा निर्वाळा दिला. त्याला झालेला त्रास हा थकव्यामुळे पायात आलेल्या गोळ्यांचा होता, असं स्पष्ट केलं. (Border – Gavaskar Trophy, Brisbane Test)
(हेही वाचा- Border – Gavaskar Trophy, Brisbane Test : ॲडलेड कसोटी लवकर संपल्यावर भारतीय संघाने तिथेच केला २ दिवस कसून सराव )
पण, ती कसोटी संपल्यावर भारतीय संघाने ॲडलेडमध्येच दोन दिवस सराव केला आहे. पण, त्यात बुमराह सहभागी झालेला नाही. त्यावरून आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅमियन फ्लेमिंगनेही या गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे. ‘बुमराहला तेव्हा पायात गोळे आले होते, हे पटण्यासारखं नाही. त्याला गोलंदाजी करताना होणारा त्रास जाणवत होता. शिवाय दुसऱ्या डावांत ते एक षटकही त्याने टाकायला नको होतं. त्याचा वेग पहिल्यासारखा नव्हता. त्याचा रनअप आणि इतर गोष्टीही बदलल्या,’ असं फ्लेमिंग सेन रेडिओशी बोलताना म्हणाला. (Border – Gavaskar Trophy, Brisbane Test)
बुमराहने उपचारांसाठी वेळ घेतला तेव्हापासून त्याचा गोलंदाजीचा वेग हा ताशी १३० किमीपर्यंत घसरला होता. एरवी पूर्ण भरात असताना बुमराह ताशी १३७ किमींपर्यंत जातो. त्याने नंतर ५ षटकंही टाकली. पण, त्यात तितका प्रभाव दिसला नाही. भरीस भर म्हणून ॲडलेड कसोटी संपल्यानंतर भारतीय संघाने दोनदा तिथेच सराव केला. पण, त्यातही बुमराह सहभागी झाला नाही. ती कसोटी संपल्यावर बुमराला जपून वापरण्याबद्दल रोहीतनेही भाष्य केलं होतं. ‘बुमराह आमचा मुख्य गोलंदाज आहे. त्याच्यावर अतिरिक्त भार पडू नये याची काळजी घेणं ही आमची प्राथमिकता आहे. त्याला विश्रांती कशी देता येईल हे मी नेहमीच बघतो. प्रत्येक स्पेलनंतर मी त्याला जातीने विचारतो की, त्याचं शरीर थकलेलं नाही ना,’ असं रोहित सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला होता. (Border – Gavaskar Trophy, Brisbane Test)
(हेही वाचा- Jalna Truck Firing: जालन्यात टोलनाका परिसरात ट्रक चालकावर गोळीबार; नेमकं प्रकरण काय?)
सध्या प्रश्न आहे तो बुमराहला आता फक्त विश्रांतीची गरज आहे की उपचारांची? पहिल्या पर्थ कसोटीत बुमराहने ८ बळी मिळवून भारताला कसोटी जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला होता. दोन्ही डावांत आधाडीची फळी कापून काढण्यात त्याचाच वाटा होता. तर दुसऱ्या कसोटीतही पहिल्या डावांत त्याने ४ बळी मिळवले. पण, त्यासाठी १९ षटकं गोलंदाजीही केली. मागची काही वर्षं बुमराह अव्याहत क्रिकेट खेळत आहे. त्याच्याबरोबरच्या सिराजला नेहमीचा सूर गवसलेला नसताना तसंच आकाशदीप, हर्षित राणा आणि नितिश शेट्टी फारसे प्रभावी ठरत नसताना भारतीय संघाची मदार ही जसप्रीत बुमराहवरच आहे. (Border – Gavaskar Trophy, Brisbane Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community