Congress Legislature Group Leader : काँग्रेसला मिळत नाही विधिमंडळ गटनेता ?

48
Congress Legislature Group Leader : काँग्रेसला मिळत नाही विधिमंडळ गटनेता ?
Congress Legislature Group Leader : काँग्रेसला मिळत नाही विधिमंडळ गटनेता ?

महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेत काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वाद आणि गटबाजीची स्थिती चिंतेचा विषय बनली आहे. निकाल लागून १८ दिवस उलटले. त्यातल्या त्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन देखील पार पडले. १६ तारखेपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. तरी काँग्रेस पक्षाला मात्र विधिमंडळात अजूनही गटनेता सापडलेला नाही. सध्या काँग्रेस पक्षाचे काही नेते आणि कार्यकर्ते एकमेकांमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. यामुळे विधानमंडळात काँग्रेसच्या गटाची स्थिती दयनीय होत आहे आणि पक्षाच्या एकसंधतेस धोका निर्माण झाला आहे. (Congress Legislature Group Leader)

(हेही वाचा- Syria Update : सीरियामधून ७५ भारतीयांना सुरक्षित काढले बाहेर; ‘या’ मार्गाने परतणार मायदेशी)

काँग्रेसकडे ज्येष्ठता पाहता विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांची गटनेता पदी वर्णी लागू शकते. मात्र विदर्भातून येणारे हे दोन बडे नेते आता पर्यंत कसे वागतात हेच काँग्रेसचे नेतृत्व पाहत होते.काँग्रेसचे दिग्गज नेते यंदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानं पक्षाकडे फारसे पर्याय नाहीत.काँग्रेस पक्षाच्या उच्चस्तरीय नेतृत्त्वाने या गटबाजीला तातडीने समुपदेशन व एकात्मतेचा मार्ग अवलंबण्याचा इशारा दिला आहे. तथापि, गटबाजीचे मुद्दे पुन्हा उफाळले असून पक्षाच्या भविष्यासाठी हा एक अडचणीचा मुद्दा ठरू शकतो. (Congress Legislature Group Leader)

तत्पूर्वी, काँग्रेसच्या विविध गटांमध्ये असलेल्या अंतर्गत वादामुळे काँग्रेसची  वाताहत झालेली आहे.अजूनही पक्षाचा विधिमंडळातील गटनेता निवडता आलेला नाही असे असतानाच विरोधी पक्षनेता पदासाठी महाविकास आघाडी मध्ये अंतर्गत कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. (Congress Legislature Group Leader)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.