Amazon in Quick Commerce : ॲमेझॉनवरही मिळणार आता १५ मिनिटांत वस्तूची घरपोच सेवा

Amazon in Quick Commerce : क्विक कॉमर्स क्षेत्रातील स्पर्धा त्यामुळे वाढणार आहे

75
Amazon in Quick Commerce : ॲमेझॉनवरही मिळणार आता १५ मिनिटांत वस्तूची घरपोच सेवा
Amazon in Quick Commerce : ॲमेझॉनवरही मिळणार आता १५ मिनिटांत वस्तूची घरपोच सेवा
  • ऋजुता लुकतुके

जगभरातील आघाडीची ई – कॉमर्स कंपनी असलेल्या ॲमेझॉनन भारतात १५ मिनिटांत वस्तू घरपोच देण्यासाठी क्विक कॉमर्स सेवा सुरू केली आहे. त्यामुळे झेप्टो, स्विगी, बिग बास्केट या कंपन्यांना आता ॲमेझॉनशी जोरदार टक्कर द्यावी लागणार आहे. याशिवाय ब्लिंक-इट आणि फ्लिपकार्ट मिनिट्स या सेवाही सध्या भारतात उपलब्ध आहेत. आधीच्या बातमीनुसार, ॲमझॉन तेज नावाने ही सेवा सुरू होणार होती. पण, प्रत्यक्षात ॲमेझॉनने या सेवेला अजून नाव दिलेलं नाही. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर बंगळुरूमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. (Amazon in Quick Commerce)

(हेही वाचा- Border – Gavaskar Trophy, Brisbane Test : चेतेश्वर पुजाराच्या मते भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले पाहिजेत हे बदल)

ॲमेझॉन इंडियाचे भारतीय व्यवस्थापक समीर कुमार यांनी या सेवेविषयची माहिती पत्रकारांना दिली. ‘निवड, मूल्य आणि सेवा ही ॲमेझॉनची वैशिष्ट्य आहेत. आणि सेवेचा हाच दर्जा कायम ठेवून भारतभरात उद्योजकतेचं उदाहरण उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. क्विक कॉमर्सचा उद्योग नफ्यात परिवर्तित करण्याचा आमचा प्रयत्न असेल,’ असं कुमार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. (Amazon in Quick Commerce)

त्यामुळे आधीच प्रचंड स्पर्धा असलेल्या या क्षेत्रात आता ॲमेझॉनच्या प्रवेशानंतर आक्रमक रणनीती पाहायला मिळणार असं दिसत आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक पिनकोड पर्यंत वर्षभरात पोहोचण्याचं उद्दिष्ट सध्या ॲमेझॉनने ठेवलं आहे. ई कॉमर्स क्षेत्रात भारतीय ग्राहकांना असलेली गरज दिवसेंदिवस बदलत आहे. ऑनलाईन खरेदीकडे ओढा वाढत असतानाच घरपोच सेवा किती लवकर मिळते यावरही ग्राहकांचा कल बदलत आहे. आणि त्या कलानुसार, नवीन रणनीती आखताना या कंपन्यांची दमछाक होताना दिसत आहे. त्यातूनच १० मिनिटांत घरपोच सेवा देण्याची कल्पना आधी झेप्टोने सुरू केली. पण, त्यात आता खूपच स्पर्धा निर्माण झाली आहे. (Amazon in Quick Commerce)

(हेही वाचा- star cement share price : star cement च्या share ची किंमत किती आहे?)

१ ते २ दिवसांत घरपोच सेवा देणाऱ्या सेवांपेक्षा काही मिनिटांत सेवा देणाऱ्या क्लिक कॉमर्सकडे भारतीय ग्राहकांचा ओढा वाढताना दिसतोय. त्यामुळे अशा कंपन्या ई कॉमर्स कंपन्यांचा महसूल कमी करताना दिसत आहेत. अशावेळी जवळ जवळ सगळ्याच ई – कॉमर्स कंपन्या क्विक कॉमर्सकडे वळताना दिसत आहेत. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट हे देशातील दोन मोठे ई – कॉमर्स खेळाडूही आता या स्पर्धेत उतरताना दिसत आहेत. ॲमेझॉनकडून या सेवेची तयारी काही महिने सुरू होती. (Amazon in Quick Commerce)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.