purna wildlife : पूर्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये कोणकोणते प्राणी आणि जीव पाहायला मिळतात?

30
purna wildlife : पूर्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये कोणकोणते प्राणी आणि जीव पाहायला मिळतात?

पूर्णा वन्यजीव अभयारण्य हे भारतातल्या गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांमधलं पश्चिम घाट पर्वत रांगेतलं एक वन्यजीव अभयारण्य आहे. दक्षिण गुजरातमध्ये हे अभयारण्य व्यारा, तापी जिल्हा आणि अहवा, डांग जिल्हा यांच्या दरम्यान आहे आणि महाराष्ट्रात हे अभयारण्य नंदुरबार जिल्ह्यात आहे. डांग्स जिल्ह्याव्यतिरिक्त पूर्णा वन्यजीव अभयारण्य हे डांग्सच्या जंगलाच्या उत्तर विभागाचा एक भाग आहे.

१९९० सालच्या जुलै महिन्यात हे जंगल अभयारण्य घोषित करण्यात आलं. ‘पूर्णा वन्यजीव अभयारण्य’ हे नाव या जंगलातून वाहणाऱ्या पूर्णा नदीवरून ठेवण्यात आलं आहे. (purna wildlife)

(हेही वाचा – star cement share price : star cement च्या share ची किंमत किती आहे?)

पूर्णा वन्यजीव अभयारण्याची भौतिक स्थिती आणि हवामान

या अभयारण्यात सागवान आणि बांबूचं घनदाट जंगल आहे. येथे पावसाळ्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडतो. इथे उष्णकटिबंधीय हवामान असतं. या प्रदेशात सरासरी २५०० मिमी एवढा पाऊस पडतो.

नोव्हेंबरच्या मध्यापासून ते फेब्रुवारीच्या अखेरीस इथलं हवामान थंड असतं. जानेवारीच्या महिन्यात इथलं सरासरी तापमान १०°C पर्यंत असतं. मार्च ते मे महिन्याच्या अखेरीस इथलं तापमान ३५°C ते ४०℃ पर्यंत असतं. तर जून महिन्याच्या मध्यापासून किंवा जुलैच्या सुरुवातीला या ठिकाणी पावसाळ्याला सुरुवात होते. हा पाऊस कमी-जास्त प्रमाणात सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो. (purna wildlife)

पूर्णा वन्यजीव अभयारण्याला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे हिवाळ्याच्या सुरुवातीला आहे. या काळात नदी आणि नाले पाण्याने भरलेले असतात. या अभयारण्यापासून सर्वात जवळचं मोठे शहर म्हणजे सुरत होय. सुरत हे शहर पूर्णा वन्यजीव अभयारण्यापासून १०० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तसंच या अभयारण्यापासून व्यारा हे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन इथून २० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.

इको-टूरिझम विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून गुजरात सरकारने पूर्णा वन्यजीव अभयारण्यात महाल कॅम्प साइट मेंटेन केली आहे.

(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy, Brisbane Test : चेतेश्वर पुजाराच्या मते भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले पाहिजेत हे बदल)

पूर्णा वन्यजीव अभयारण्यातलं प्राणी आणि वनस्पती जीवन

हे अभयारण्य उत्तर-पश्चिम घाटाच्या आर्द्र पानझडी जंगलांच्या क्षेत्रात आहे.

या जंगलांमध्ये वेगवेगळ्या वनस्पती आणि झाडांच्या सुमारे ७०० प्रजाती आढळतात.

तसंच येथे वन्य प्राण्यांपैकी बिबट्या, रीसस मॅकॉक, बोनेट मॅकॉक, मुंगूस, इंडियन सिव्हेट मांजर, इंडियन पोर्क्युपिन, चार शिंगे असलेलं हरीण, बार्किंग डियर, सांबर, चितळ, हायना आणि जंगली मांजर इत्यादी प्राणी आढळतात.

नवसारी जिल्ह्यातलं वांसदा राष्ट्रीय उद्यान आणि डांगांचं जंगल, शूलपाणेश्वर वन्यजीव अभयारण्य आणि नर्मदा जिल्हा हे महाराष्ट्र राज्याशी संलग्न आहेत. या भागात बंगाल टायगर नामशेष झाल्याची माहिती आहे. पण तरीही मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जिथे गुजरात राज्याच्या सीमा आहेत, त्या भागात बंगाल टायगर्स आहेत. (purna wildlife)

१९९९ ते २००३ सालादरम्यान या अभयारण्यात पक्षांच्या वेगवेगळ्या १३९ प्रजातींची नोंद करण्यात आली होती. येथे आढळणारे काही पक्षी सामान्य राखाडी हॉर्नबिल्स, ग्रे जंगल फॉउल, बार्बेट, वुडपेकर, श्राइक्स, लीफबर्ड्स, मधमाशी खाणारे, फ्लायकॅचर, जंगली घुबड आणि राप्टर्स हे आहेत. २००० ते २००१ साली केलेल्या नोंदणीनुसार पूर्णा वन्यजीव अभयारण्य हे कोळ्यांच्या ११६ प्रकारच्या वेगवेगळ्या प्रजातींचं घर आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.