godrej bkc mumbai : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सबद्दल ह्या अद्भुत गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

52
godrej bkc mumbai : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सबद्दल ह्या अद्भुत गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स हे मुंबई शहरातलं मध्यवर्ती व्यापारी केंद्र आहे. हे एक प्रमुख उच्च दर्जाचे व्यावसायिक केंद्र आहे. इथल्या प्रॉपटीचे रेट्स हे देशातल्या सर्वांत जास्त रेट्सपैकी एक आहेत. MMRDA च्या नुसार मुंबईच्या पूर्वेकडच्या भागात कार्यालये आणि व्यावसायिक उलढालींच्या “पुढील लक्ष्याचं एकत्रिकरण” करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या “ग्रोथ सेंटर्स” पैकी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स हे पहिलं कॉम्प्लेक्स आहे. (godrej bkc mumbai)

महानगरात नियोजित व्यावसायिक रिअल इस्टेटची नवीन क्षेत्रे तयार करताना वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मुळे दक्षिण मुंबईतील CBD म्हणजेच सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टची गर्दी कमी होण्यास मदतच झाली आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे जम्मू अँड काश्मीर बँक, नॅशनल बिझनेस सेंटर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, सेबी, एसआयडीबीआय, ओएनजीसी, पंजाब नॅशनल बँक, ट्विटर इंडिया, नाबार्ड हेड ऑफिस, निता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर, आयसीआयसीआय बँक, सिटी बँक यांसारख्या अनेक व्यावसायिक इमारती आहेत. (godrej bkc mumbai)

(हेही वाचा – purna wildlife : पूर्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये कोणकोणते प्राणी आणि जीव पाहायला मिळतात?)

तसंच बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, भारत डायमंड बोर्स, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, एलआय अँड एफएस, अमेझॉन डॉट कॉम, स्पॉटीफाय, एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, डव्ह केमिकल्स, अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट इंडिया, फॉर्च्युन २०००, जिओ वर्ल्ड सेंटर, जिओ वर्ल्ड ड्राइव्ह आणि जिओ वर्ल्ड गार्डन आणि ऍपल बीकेसी नावाचं भारतातलं पहिलं ऍपल देखील आहे. (godrej bkc mumbai)

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं क्रिकेट मैदान, युनायटेड स्टेट्सचं काँस्युलेट, मुंबई आणि ब्रिटीश उप-उच्चायुक्तालय, रुस्तमजी सीझन्स, हबटाउन सनस्टोन, टेन बीकेसी, कल्पतरू मॅग्नस, कल्पतरू स्पार्कल, रुस्तमजी ओरियाना हेही आहे. संपूर्ण वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये सुमारे चार लाखपेक्षा जास्त लोक काम करतात. (godrej bkc mumbai)

(हेही वाचा – fashion street camp pune कोणत्या कारणासाठी आहे प्रसिद्ध?)

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या व्यावसायिक विकासामध्ये खाजगी तसंच शासकीय कार्यालयं (राज्य आणि केंद्र), बँका, घाऊक आस्थापनांचा समावेश होतो. या परिसरात आणखी २०,००,००० नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएने आतापर्यंत ‘ई’ ब्लॉकमध्ये १९ हेक्टर पाणथळ जमीन विकसित केली आहे. या ठिकाणी १७४,००० चौरस मीटरच्या क्षेत्रात अनेक कार्यालयीन इमारती बांधल्या गेल्या आहेत. त्यांत १७,४०० नोकऱ्या उपलब्ध करण्याची क्षमता आहे. या ब्लॉकमध्ये सुमारे २२,५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर ‘सिटी पार्क’ नावाचा अर्बन प्लाझा आणि पार्क विकसित करण्यात आलं आहे. (godrej bkc mumbai)

अलिकडच्या काही वर्षांत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स हे मुंबईच्या नरिमन पॉइंट आणि कफ परेडनंतर महाराष्ट्रातील तिसरं सर्वांत प्रमुख व्यावसायिक हब बनलं आहे. तरी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स हे ज्या दलदलीच्या जमिनीवर वसलेलं आहे, त्या परिसरात सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांचा अभाव असल्यामुळे उंच इमारतींचे बांधकाम आणि इतर सार्वजनिक वाहतूक सुविधा यांसारख्या क्षेत्राच्या पुढच्या विकासासाठी आव्हान आहे. तसं असूनही २०३० सालापर्यंत नरिमन पॉइंट आणि कफ परेडपेक्षा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि परळ हे मुंबईतले सर्वांत महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र बनतील अशी अपेक्षा आहे. (godrej bkc mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.