कर्नाटक विधानसभेत लावलेले स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचे छायाचित्र हटवले जाणार नाही, असे आश्वासन कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यू.टी. खादर यांनी दिले. ‘एखादी गोष्ट (सावरकरांचे छायाचित्र) काढणे योग्य नाही. त्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. त्याऐवजी लोकांना एकत्र आणणे आणि समाजात सौहार्दपूर्ण वातावरण सुनिश्चित करणे यांसारख्या गोष्टी हाती घेतल्या पाहिजेत’, असे खादर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
(हेही वाचा Hindu Janajagruti Samiti च्या विरोधानंतर एम. एफ. हुसेन यांनी काढलेली देवतांची नग्नचित्रे गुपचूप हटवली)
सवंग लोकप्रसिद्धीसाठी काँग्रेस कायम वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा वापर करत असते. जेव्हा जेव्हा काँग्रेसला राजकीयदृष्ट्या अस्थिर वाटू लागते तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी वीर सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून चर्चेत राहतात. त्यांचीच री काँग्रेसचे सरकार असलेले कर्नाटक सरकार ओढत आहे. कर्नाटकात २०२२मध्ये भाजपाचे सरकार होते तेव्हा तेथील विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची प्रतिमा लावली होती, ती प्रतिमा काढण्याचा निर्णय तेथील मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी घेतला होता. मात्र विधानसभा सभागृहासंबंधी कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा अधिकार विधासभा अध्यक्षांचा असतो आणि अध्यक्षांनी मात्र या निर्णयाच्या विरोधातील हिंदूंच्या दबावामुळे सभागृहातून वीर सावरकर यांचे चित्र न काढण्याचा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community