- खास प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने नाकारले. इतके की विरोधी पक्षातील एकालाही विरोधी पक्षनेता निवडीसाठी किमान २९ आमदारांची संख्या गाठता आली नाही तर दुसरीकडे महायुतीला भरभरून दिले की कॉंग्रेस-उबाठाला विरोधी पक्षनेता निवडीसाठीही भाजपाची परवानगी घ्यावी लागणार आहे. विरोधी पक्षनेता होण्यासाठी आता कॉंग्रेस-उबाठामध्येच जुंपली असल्याचे चित्र समोर आले आहे. (Leader Of Opposition)
(हेही वाचा – Best Bus : खासगी बस चालकांची निष्ठा प्रवाशांऐवजी किलोमीटरशी; माजी विरोधी पक्षनेत्याचा आरोप)
तोंडघशी का पडू?
“विरोधी पक्ष नेतेपद भाजपा आणि देवेंद्रजी तयार आहेत का? ते आधी विचारू आणि मग विरोधी पक्षनेता कोण असावा त्याचे नाव आम्ही भाजपाला देऊ,” असे कॉंग्रेस आमदार माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, “भाजपा जर विरोधी पक्षनेते पद देण्यास तयार नसेल तर आम्ही का तोंडघशी पडू, आम्ही मग नाव देणार नाही.” (Leader Of Opposition)
(हेही वाचा – ST Corporation : अपघात रोखण्यासाठी एसटी महामंडळाची त्रिसुत्री)
अद्याप नावाची शिफारस नाही
दरम्यान, विरोधी पक्ष नेते पदाबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेउ शकतात, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. यावर बोलताना नार्वेकर यांनी सांगितले की अद्याप कॉंग्रेस किंवा विरोधी पक्षाकडून कोणत्याही नावाची शिफारस आलेली नाही. (Leader Of Opposition)
मविआतील सर्वात मोठा पक्ष हा शिवसेना उबाठा असून त्यांचे २० आमदार निवडून आले आहेत. विरोधी पक्षनेते पदासाठी एकूण सदस्य २९ असणे आवश्यक आहे. तर दिल्ली पॅटर्नने विरोधी पक्षनेते पद द्यावे, अशी मागणी शिवसेना उबाठाने केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community