संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकारने वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला पळता भुई थोडी झाली आहे. हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारने दिलेल्या माहितीनुसार, वक्फ बोर्डा’ने (Waqf Board) ९९४ मालमत्ता अनधिकृतरित्या गिळंकृत केल्या आहेत.
( हेही वाचा : Rameshwar Naik यांची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुख पदावर नियुक्ती)
अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी काँग्रेसला जोरदार धक्का दिला. तसेच ‘वक्फ’च्या काळ्या कारनाम्यांचा बुरखा टराटरा फाडला. रिजिजू यांनी एक धक्कादायक अहवाल संसदेसमोर सादर केला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी गटाचे नेते जॉन ब्रिटास (John Brittas) यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना किरेन रिजिजू यांनी या अहवालातील माहिती संसदेसमोर सादर केली. त्यानुसार ‘वक्फ बोर्डा’ने देशातील ९९४ मालमत्ता अनधिकृतरित्या बळकावल्याचे धक्कादायक माहिती रिजिजू यांनी दिली. तसेच ‘वक्फ’चे सर्वाधिक बळी हे तमिळनाडूतील नागरिक असल्याचे देखील रिजिजू (Kiren Rijiju) यांनी सांगितले.
हडप केलेल्या ९९४ मालमत्तांपैकी ७३४ मालमत्ता या फक्त तामिळनाडू राज्यातील असल्याचे देखील सरकरच्या वतीने सांगण्यात आले. तमिळनाडूच्या खालोखाल आंध्र प्रदेशमधील १५२, पंजाबमध्ये ६३, उत्तराखंडमधील ११, तर जम्मू आणि काश्मीर या राज्यातील दहा मालमत्ता बळकावण्यात आल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांनी संसदेने (Kiren Rijiju) दिली.
भारतीय पुरातत्त्व खात्याला देखील ‘वक्फ’चा विळखा
दरम्यान भारतीय पुरातत्त्व खात्याच्या (Archaeological Survey of India) २५० मालमत्तादेखील ‘वक्फ’ने(Waqf Board) हडप केल्या आहेत. पुरातत्त्व खात्याच्या माध्यमातून हा मुद्दा संयुक्त संसदीय समितीसमोर मांडण्यात येणार आहे. पूर्वी ही संख्या १२० असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तपासणीनंतर हा आकडा २५० वर पोहोचला आहे, अशी माहिती रिजिजू (Kiren Rijiju) यांनी दिली.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community