KEM Hospital परिसरात डिन बंगल्यासह इतर बांधकाम तोडून बांधणार शताब्दी टॉवर!

486
KEM Hospital परिसरात डिन बंगल्यासह इतर बांधकाम तोडून बांधणार शताब्दी टॉवर!
KEM Hospital परिसरात डिन बंगल्यासह इतर बांधकाम तोडून बांधणार शताब्दी टॉवर!

विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबई महापालिकेचे के.ई.एम. रुग्णालयाच्या (KEM Hospital ) परिसरातील डिन बंगल्यासह जुन्या तीन इमारती आणि भांडारगृह पाडून तिथे केईएम रुग्णालयाच्या शतकपूर्ती वर्षांची आठवण म्हणून ३२ मजली शताब्दी अर्थात सेंटेनरी टॉवर उभारण्याचा महापालिका आरोग्य पायाभूत सेवा सुविधा विभागाचा विचार आहे. मात्र, एका बाजुला महापालिकेने २ लाख ३५ हजार कोटी रुपयांच प्रकल्प हाती घेतले असून त्याचा खर्च भागवणे जिकरीचे बनत आहे. असे असतानाच या केईएम रुग्णालय परिसरात ३२ मजली निवासी वापरासह इमारत बांधण्याची गरज काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

( हेही वाचा : CM Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिल्ली दौरा; महायुतीचा खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरणार

के. ई. एम. रुग्णालयाच्या (KEM Hospital )आवारात सीओ वन, सीओ टू, सीओ तीन आणि भांडारगृह अशा चार जुन्या इमारती आहेत. या इमारती पाडून तेथील उपलब्ध सुमारे ४००० चौरस मीटर जागेवर रुग्णालयाची नवीन तंत्रज्ञान / अद्ययावत उपकरणासहित ३०० बेड व २२ ऑपरेशन थियेटर सह ३२ मजली इमारत बांधण्यासाठी महापालिकेच्या वास्तुविशारद विभागामार्फत आराखडा तयार करण्यात आलेला आहे. परंतु सदर प्रस्तावास अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नसल्याने पुढील कार्यवाही होऊ शकली नाही.

के. ई. एम. रुग्णालयात वर्षभरात २५ लाखांपर्यंत बाह्य रुग्ण उपचार घेतात. आणि तेथील बेड नेहमीच भरलेले असतात. हि वस्तुस्थिती लक्षात घेता मध्य मुंबईतील ह्या महत्वाच्या व मोठ्या रुग्णालयात येणाऱ्या शतकपूर्ती वर्षामध्ये सुसज्ज ३२ मजली नवीन इमारत बांधण्यासाठी तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक आणि प्रवक्ते भालचंद्र शिरसाट (Bhalchandra Shirsat) यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

येत्या वर्षी शतकपूर्ती महोत्सव साजरा करित आहे. सध्या रुग्णालयातील विविध इमारतींमध्ये २२०० बेड विखुरलेले आहेत. या जुन्या इमारती हेरीटेज मध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान / अद्ययावत उपकरणे बसविण्यासाठी आपणांस इमारतीमध्ये संरचनात्मक बदल करता येत नाही,असे शिरसाट यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

या शताब्दी रुग्णालय अर्थात सेंटेनरी टॉवरचा विकास पूर्वी डिन बंगला वगळून अन्य बांधकामे पाडून करण्यात येणार होता. परंतु काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी (Dr. Bhushan Gagrani) आणि अतिरिक्त डॉ विपीन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांच्यासमवेत झालेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत डिन बंगलोसह इतर जुनी बांधकामे तोडून नवीन ३२ मजली इमारतीचे बांधकाम करण्याचा निर्णय घेऊन त्याचा विकास आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पुढील बीओक्यू नुसार निविदा मागवण्यासाठी प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता असते. ही प्रशासकीय मान्यता मिळाल्यनंतर निविदा प्रक्रिया राबवली जाते आणि त्यानंतर निविदा प्रक्रियेतील लघुत्तम निविदाकाराची निवड केली जाते.

केईएम रुग्णालयात (KEM Hospital ) सध्या कर्मचारी भवनच्या कामाला मंजुरी देवून कार्यादेशनुसार या कामाला सुरुवात झाले आहे. पूर्वी डिन बंगल्याचा समावेश नव्हता, परंतु आता डिन बंगल्याचा समावेश केल्यामुळे याचा आराखडा बनवण्याच्या कामाला विलंब झाला. याच डिन बंगल्याचे बांधकाम तोडले जावू नये अशी मागणी उबाठा शिवसेनेचे सचिन पडवळ यांनी निवेदनाद्वार केली होती, तसेच याला डिन यांचा विरोध असल्याने डिन निवासस्थान या इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर दिले जावे अशी सूचना करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

मात्र, एका बाजुला महापालिका प्रशासन सध्या मंजुर केलेल्या, हाती घेतलेल्या आणि पूर्णत्वास येत असलेल्या प्रकल्पाला गती देण्याचा आणि आर्थिक डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच नवीन प्रकल्प हाती घेताना महापालिका प्रशासन प्रत्येक गोष्टींचा विचार करत असून आता प्राधान्य क्रमाने आवश्यकतेनुसार प्रकल्प हाती घेण्याचा प्रयत्न केला जाईल,असे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (KEM Hospital )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.