रेल्वेत होणार ५८,६४२ जांगासाठी भरती! मंत्री Ashwini Vaishnaw यांची माहिती

65
रेल्वेत होणार ५८,६४२ जांगासाठी भरती! मंत्री Ashwini Vaishnawयांची माहिती
रेल्वेत होणार ५८,६४२ जांगासाठी भरती! मंत्री Ashwini Vaishnawयांची माहिती

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी रेल्वे जॉबबाबत (Railway job) माहिती दिली आहे. केंद्र सरकार (Central Govt) तरुणांना रेल्वे नोकरीची संधी देण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचं आश्विनी वैष्णव यांनी म्हटलं. तसेच रेल्वेत 58 हजार 642 रिक्त जागांसाठी अंतर्गत प्रक्रिया सुरु असल्याचं अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी बुधवारी (११ डिसेंबर) लोकसभेत म्हटलं.

रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे (सुधारणा) विधेयकाबाबत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ही माहिती दिली. रेल्वे मंत्र्यांच्या उत्तरानंतर विधेयक आवाजी मतदाने मंजूर करण्यात आलं. अश्विनी वैष्णव म्हणाले, “मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की यूपीए सरकारच्या काळात 4 लाख 11 हजार जणांना रेल्वेत नोकरी मिळाली होती. तर आता मोदी सरकारमध्ये 5 लाख 2 हजार तरुणांना रेल्वेत नोकरी मिळाली आहे. रेल्वेत 58 हजार 642 रिक्त जागांसाठी पदभरतीची प्रक्रिया सुरु आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये रेल्वेत तरुणांना अधिक नोकरीची संधी उपलब्ध करु देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.” असं रेल्वे मंत्री म्हणाले. (Ashwini Vaishnaw)

हेही वाचा-Maharashtra Weather : राज्यात तापमान घसरले ! सर्वत्र धुक्याची चादर, वाचा IMD चा सविस्तर अंदाज

मोदींच्या नेतृत्वात रेल्वे अर्थसंकल्पात वाढ झाल्याचं मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. “याआधी रेल्वेचं बजेट हे 25-20 हजार कोटी इतकं असायचं. मात्र आता मोदी सरकारमध्ये त्यात वाढ करण्यात आली आहे. मोदी सरकारमध्ये रेल्वे बजेट 2.52 लाख कोटी इतकं आहे. या 10 वर्षांमध्ये 31 हजार किलोमीटर नवे रेल्वे मार्ग तयार करण्यात आले आहेत. तसेच 15 हजार किमी रेल्वे ट्रॅकवर ‘रेल्वे कवच यंत्रणा’ कार्यन्वित करण्यात आली आहे. समृद्ध देशात जी कामं 20 वर्षात झाली आहेत, त्यासाठी भारतात फक्त 5 वर्ष लागली.” अशी माहिती त्यांनी दिली. (Ashwini Vaishnaw)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.