महाविकास आघाडीतील आमदार, खासदार संपर्कात…? भाजपा प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचा गौप्यस्फोट

272
महाविकास आघाडीतील आमदार, खासदार संपर्कात...? भाजपा प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचा गौप्यस्फोट
महाविकास आघाडीतील आमदार, खासदार संपर्कात...? भाजपा प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचा गौप्यस्फोट
महाविकास आघाडीतील अनेक आमदार-खासदार अस्वस्थ असून, ते आपली अस्वस्थता आता खाजगीत आमच्याकडे व्यक्त करीत असून, अनेकजण भाजपाच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केला. (Chandrashekhar Bawankule)
ते म्हणाले, नुकत्याच लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या.लोकसभेत राज्यात आम्हाला जरी अनपेक्षित यश मिळाले असले तरी विधानसभेला दारुण पराभवाला जावे लागले ही वस्तुस्थिती आहे. पुढच्या निवडणुकांना अजून तब्बल ५ वर्षाचा मोठा कालावधी आहे.मात्र तरीही आमच्या पक्षांचे आमच्याकडे दुर्लक्ष होत असून, पक्षांकडून पाठबळ मिळत नाही, मतदारसंघांतल्या परिस्थितीविषयी बैठकांचे आयोजन केले जात नाही, आता निवडून आलो असल्याने आम्हाला आमच्या मतदार संघाच्या विकासासाठी आगामी ५ वर्षात सत्तारुढ सरकारचेच केंद्रात असो की राज्यात निधीची गरज तर लागणारच आहे. त्यामुळे मग आम्हाला भाजपा शिवाय अन्य पर्याय दिसत नाही असे बहुतेक जण बोलून दाखवत आहेत, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली. (Chandrashekhar Bawankule)
आघाडीच्या नेत्यांचे कायम रडगाणे
ऑपरेशन लोटस संदर्भात बावनकुळे म्हणाले, की तपास यंत्रणा त्यांचे काम करत असतात.आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. ईडी, सीबीआयचा वापर केला जातो, हे महाविकास आघाडीच्या लोकांचे नेहमीचे रडगाणे आहे.मात्र, मोदीजींनी केलेल्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमच्या पक्षात कोणी आले तर, त्यांचे स्वागतच करू, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. (Chandrashekhar Bawankule)
…तरं त्यांना समजही देऊ
मारकडवाडी येथे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत त्यांनी अशी टीका करणे अयोग्य आहे. त्यांना पार्टीकडून समज देण्यात येईल, असे स्पष्ट करतानाच,मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते आणि आमचे केंद्रीय नेतृत्व चर्चा करून समन्वयाने योग्य निर्णय घेईल.आम्ही जनतेला जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याला आमचे सध्या प्राधान्य असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. (Chandrashekhar Bawankule)
हा तर ईव्हीएमबाबत फेक नरेटिव्ह !
मारकडवाडी गावातील मतदानाची आकडेवारी मी मांडलेली असून आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडीकडून ईव्हीएम बाबत फेक नरेटिव्ह चालवला जात आहे. मात्र ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा आपण निवडणुकीत कुठे कमी पडलो, याचा शोध महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घ्यायला हवा, असा सणसणीत टोलाही त्यांनी यावेळी लगावला.  (Chandrashekhar Bawankule)
 
लाडक्या बहिणींचा विरोधक पटोलें सोबत!
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जनतेने काठावर सांभाळले आहे. अतिशय कमी मतांनी ते विजयी झाले. आपल्याकडे जनतेने पाठ का फिरवली याची कारणे त्यांनी शोधली पाहिजेत. ज्या काँग्रेस नेत्याने लाडकी बहिण योजना बंद करावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली.ते अनिल वाडपल्लीवार हे त्यांच्या निवडणुकीचे प्रमुख होते, अशी अनेक कारणे काँग्रेससाठी मारक ठरली, असा दावा ही बावनकुळे यांनी केला. (Chandrashekhar Bawankule)
विश्लेषण सोडून विरोधकांची नौटंकी
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच ईव्हीएमबाबतचे विरोधकांचे आक्षेप फेटाळले असून, तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले आणि हरता तेव्हा चांगले नाही, असे म्हणत फटकारले आहे. त्यामुळे आताही ते न्यायालयात गेले तरी, काही होणार नाही.जनतेनेच आपल्याला नाकारले हे सत्य स्वीकारून विरोधकांनी पराभवाचे आत्मचिंतन केले पाहिजे.लोकसभा निवडणुकीत पार्टी म्हणून आम्ही देखील कमी पडलो होतो.परंतु, त्यानंतरही आम्ही पुन्हा लोकांमध्ये गेलो. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम केले. पुन्हा संघटना बांधणी केली, याकडेही त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.  (Chandrashekhar Bawankule)
 
…..आता आत्मपरीक्षण करावे….!
विरोधी पक्षनेतेपदाबाबत विधानसभेचे अध्यक्ष कायदे आणि नियम यांचा विचार करून योग्य तो निर्णय घेतीलच मात्र आपल्याला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याएवढाही जनाधार का मिळाला नाही, याचबाबत विरोधकांनी आत्मपरिक्षण करायला हवे,असा उपरोधिक सल्लाही बावनकुळे यांनी यावेळी दिला. (Chandrashekhar Bawankule)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.