Ajit Pawar: अजित पवारांनी ट्विट करत शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले …

61
Ajit Pawar: अजित पवारांनी ट्विट करत शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले ...
Ajit Pawar: अजित पवारांनी ट्विट करत शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले ...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (१२ डिसेंबर) वाढदिवस (Sharad Pawar Birthday) आहे. यानिमित्त शरद पवार यांच्या पक्षाच्या ‘एक्स’ हँडलवर एक खास ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमधून शरद पवारांच्या जीवनातील खास प्रसंग दाखवण्यात आले आहे. तर त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित पवार ट्विट करत म्हणाले, “आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.” असे त्यांनी शुभेच्छा देताना ट्विटमध्ये म्हटले आहे.(Ajit Pawar)

त्याचप्रमाणे शरद पवार यांची लेक म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील आपल्या वडिलांना ट्वीटरच्या (एक्स) माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, ”प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी अक्षय ऊर्जेचा अखंड स्रोत आहात. एखाद्या अविचल दीपस्तंभाप्रमाणे तुम्ही आम्हाला मार्ग दाखवित असता. तुम्ही दाखवून दिलेल्या लोककल्याणाच्या वाटेवरुन चालण्याचा आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत. तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने दिर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!”, असं सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलं आहे.(Ajit Pawar)

अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी भेटीला
अजित पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. वाढदिवसाचे औचित्य साधून अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी सुप्रिया सुळेंनी या सर्वांचे स्वागत केले.

 

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.