Rajasthan News : बोअरवेलमध्ये अडकल्याने ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू !

53
Rajasthan News : बोअरवेलमध्ये अडकल्याने ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू !
Rajasthan News : बोअरवेलमध्ये अडकल्याने ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू !

राजस्थानच्या (Rajasthan News) दौसा जिल्ह्यात 3 दिवसांपासून बोअरवेलमध्ये अडकलेल्या 5 वर्षांच्या आर्यनचा (Aryan) मृत्यू झाला आहे. बुधवारी (11 डिसेंबर) रात्री 11.45 वाजता आर्यनला सुमारे 57 तासांनंतर बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. त्याला अत्याधुनिक लाइफ सपोर्ट सिस्टिमने सुसज्ज रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॅाक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Rajasthan News)

कालीखड गावात बोअरवेलमधून (Borewell) बाहेर येत असताना आर्यन बेशुद्ध अवस्थेत होता. तोही तीन दिवस भुकेने तहानलेला होता. दौसा जिल्हा रुग्णालयाचे डॉ. दीपक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाला रुग्णालयात आणताच त्याच्या ईसीजीसह सर्व तपासण्या करण्यात आल्या, मात्र त्याचा श्वास घेणे बंद झाले होते. (Rajasthan News)

प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप
बोअरवेलमधून आर्यन काढण्याच्या सहा घरगुती युक्त्या दोन दिवसांत अयशस्वी झाल्यानंतर बुधवारी सकाळपासून पायलिंग मशीनच्या सहाय्याने आणखी एक खड्डा खोदण्यात येत होता. एनडीआरएफच्या म्हणण्यानुसार आर्यनला पाईप टाकून बाहेर काढण्याची योजना होती, मात्र बुधवारी दुपारी मशीन बिघडली. यानंतर दुसरे मशीन बोलावून पुन्हा खोदकाम सुरू करण्यात वेळ लागला. दरम्यान, आर्यनची आई गुड्डी देवी यांनीही प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. सुमारे ५७ तास बोअरवेलमध्ये अडकलेल्या आर्यनला अन्न आणि पाणी पुरवण्यात प्रशासन आणि बचाव पथक अपयशी ठरले होते. (Rajasthan News)

आईसमोर बोअरवेलमध्ये पडला आर्यन
आर्यन सोमवारी (9 डिसेंबर) दुपारी 3 वाजता घरापासून 100 फूट अंतरावर असलेल्या बोअरवेलमध्ये पडला होता. तो त्याच्या आईसोबत खेळत होता, पण त्याची आई त्याला पकडण्याआधीच तो बोअरवेलमध्ये पडला. या कुटुंबाने तीन वर्षांपूर्वी ही बोअरवेल खोदली होती. मात्र, त्यात मोटार अडकल्याने ती काम करत नव्हती, तरीही ती झाकलेली नव्हती. (Rajasthan News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.