शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर, विशेषतः हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांच्या ८८ घटना घडल्याची कबुली बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने दिली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांच्या समवेत बैठक घेऊन अल्पसंख्यांकांवर होणार्या आक्रमणांचे सूत्र उपस्थित केले होते. तसेच त्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. यानंतर बांगलादेश सरकारने वरील माहिती दिली. (Hindus in Bangladesh)
(हेही वाचा- Rajasthan News : बोअरवेलमध्ये अडकल्याने ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू !)
सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांचे प्रसारमाध्यम सचिव शफीकुल आलम यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत अल्पसंख्यांकांशी संबंधित घटनांमध्ये एकूण ८८ गुन्हे नोंदवले गेले आहेत. या घटनांच्या संदर्भात ७० जणांना अटक करण्यात आली आहे. ईशान्य सुनामगंज, मध्य गाझीपूर आणि इतर भागांतूनही हिंसाचाराच्या नवीन घटना घडल्या आहेत, त्यामुळे गुन्हे आणि अटकेची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पीडितांपैकी काही जण आधीच्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य असल्याची प्रकरणेही असू शकतात. २२ ऑक्टोबरनंतर घडलेल्या घटनांचा तपशील लवकरच प्रसारित केला जाईल. (Hindus in Bangladesh)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community