Universal Health Coverage Day म्हणजे काय ? का साजरा केला जातो हा विशेष दिवस ?

35
Universal Health Coverage Day म्हणजे काय ? का साजरा केला जातो हा विशेष दिवस ?
Universal Health Coverage Day म्हणजे काय ? का साजरा केला जातो हा विशेष दिवस ?

दरवर्षी १२ डिसेंबरला Universal Health Coverage Day जगभरात साजरा केला जातो. १२ डिसेंबर २०१२ रोजी, संयुक्त राष्ट्रांनी सर्व देशांना आंतरराष्ट्रीय विकासासाठी आवश्यक प्राधान्य म्हणून सार्वत्रिक आरोग्य कव्हरेजसाठी प्रयत्न वाढवण्याचे आवाहन करणाऱ्या ऐतिहासिक ठरावाला एकमताने मान्यता दिली.

(हेही वाचा- Atul Subhash Suicide : गुन्हे मागे घेण्यासाठी पत्नीने मागितले ३ कोटी, तर मुलाला भेटण्यासाठी ३० लाख रुपये)

पुढे २०१४ मध्ये, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज कोलिशनतर्फे १२ डिसेंबर रोजी ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी #HealthforAll अंतर्गत शाश्वत विकासात्मक उद्दिष्टांचा संयुक्त राष्ट्रांच्या २०३० अजेंडाचा महत्त्वाचा भाग म्हणून समावेश करण्यात आला. २०१७ मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे १२ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिन म्हणजेच Universal Health Coverage Day म्हणून घोषित केला.

१२ डिसेंबर २०१२ रोजी, संयुक्त राष्ट्र महासभेने जगभरातील आरोग्य सेवेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. याद्वारे सार्वत्रिक आरोग्य दिनाची स्थापना करण्यात आली. ८० हून अधिक देशांतील ४०० हून अधिक संस्था या ठरावात सामील झाल्या. (Universal Health Coverage Day)

(हेही वाचा- Rajasthan News : बोअरवेलमध्ये अडकल्याने ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू !)

भारतामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने UHC (युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज) दिवस साजरा करण्यासाठी पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया, रॉकफेलर फाऊंडेशन आणि ऑक्सफॅम इंडिया यांच्यासोबत सहकार्य केले. या कार्यक्रमात विविध आरोग्य, विकास, संशोधन आणि माध्यम संस्थांमधील ६५ हून अधिक मान्यवरांनी सहभाग घेतला.

सार्वजनिक आरोग्य सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एक सरकारी आरोग्य योजना आहे, या अंतर्गत एका कुटुंबाला प्रतिवर्षी ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण दिले जाईल. त्याचा लाभ कोणत्याही सरकारी आणि काही खाजगी रुग्णालयात घेता येतो. (Universal Health Coverage Day)

(हेही वाचा- Hindus in Bangladesh : हिंदूंवरील हल्ल्यांच्या ८८ घटना घडल्या; बांगलादेशने दिली कबुली)

डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, विविध देशांमध्ये आरोग्य बजेटमध्ये कपात आणि अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची उपलब्धता नसणे इ. गोष्टी आरोग्याच्या समस्यांवर परिणाम करतात. त्यामुळे या दिनाच्या निमित्ताने आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर चिंतन करता येते आणि त्याद्वारे आरोग्याच्या सेवेमध्ये सुधारणा करता येईल. (Universal Health Coverage Day)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.