कोकणातील प्रसिद्ध असलेली जत्रा म्हणजेच भराडी देवीचा यात्रोत्सव. दरवर्षीप्रमाणं यंदाही नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आंगणेवाडीच्या (Anganewadi Jatra 2025) यात्रेचं नियोजन करण्यात आलं असून, देवी भराडीनं कौल दिल्यानंतर अखेर या यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण कोकणची काशी (Kashi of South Konkan) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची (Bharadi Devi) यात्रा यंदा 22 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडणार आहे. (Anganewadi Jatra 2025)
हेही वाचा-Rajasthan News : बोअरवेलमध्ये अडकल्याने ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू !
परंपरेनुसार कोणतीही दिनदर्शिका किंवा तिथीचा आधार न घेता देवीला कौल लावून ही तारीख ठरवण्यात येते आणि यंदाही हीच परंपरा पुन्हा एकदा पार पडली. आंगणे कुटुंबीयांच्या वतीनं यंदाच्या यात्रेची आणि देवीच्या उत्सवाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षी कोकणात भराडी देवीच्या यात्रेसाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी गर्दी करतात. परदेशातूनही या यात्रेसाठी येणाऱ्यांचा आकडा मोठा असून, नेतेमंडळी आणि काही प्रसिद्ध नावांचीही इथं हजेरी पाहायला मिळते. (Anganewadi Jatra 2025)
नवसाला पावणारी देवी
या भराडी देवीचे महत्त्व असे की, नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी या देवीची ख्याती आहे. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीची प्रसिद्धी आहे. तळ कोकणामध्ये थंडीचा हंगाम सुरू झाल्यानंतर भराडी देवीकडे सर्व भक्तांचे लक्ष लागलेले असते. (Anganewadi Jatra 2025)
दरवर्षी या या यात्रा उत्सवाला दहा ते बारा लाख भाविक येत असतात. या यात्रा उत्सवाला मोठ्या प्रमाणावरती भाविक येत असल्यामुळे पोलीस प्रशासन देखील सतर्क असलेलं पाहायला मिळतं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दरवर्षी विशेष काळजी घेत असतात. (Anganewadi Jatra 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community