Vidya Thakur यांचा पत्ता कट होणार?

84
Vidya Thakur यांचा पत्ता कट होणार?
  • खास प्रतिनिधी 

मुंबईतील उत्तर भारतीयांचे प्रतिनिधित्व म्हणून गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर (Vidya Thakur) यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४-२०१९ कार्यकाळात मंत्रीपद देण्यात आले होते. आता पुन्हा राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाले असून विद्या ठाकूर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता मावळली आहे.

२०१४-२०१९ मध्ये राज्यमंत्री

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेव उत्तर भारतीय आमदार निवडून आल्याने उत्तर भारतीयांचे प्रतिनिधित्व म्हणून ठाकूर (Vidya Thakur) यांना महिला, बाल कल्याण, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्रीपद देण्यात आले होते.

(हेही वाचा – वीर हुतात्मा Babu Gainu यांच्या बलीदान दिनानिमित्त हिंदु महासभेच्या वतीने अभिवादन)

नवा पर्याय

२०१९ तसेच २०२४ मध्ये ठाकूर विधानसभेवर निवडून आल्या असल्या तरी यावेळी बोरिवली विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच संजय उपाध्याय हे लाखाहून अधिक मताधिक्य घेत निवडून आले आहेत. यामुळे फडणवीस यांच्यापुढे उत्तर भारतीयांना प्रतिनिधित्व देण्यासाठी एक नवा पर्याय मिळाला असून ठाकूर (Vidya Thakur) यांच्याऐवजी उपाध्याय यांना मंत्री पद मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे भाजपाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

उपाध्याय पसंती?

उपाध्याय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तिय असून मुंबईत उत्तर भारतीय समाजात सक्रिय असल्याने भविष्यात महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांची मते मिळवण्यासाठी उपाध्याय यांची मदत होऊ शकते. या बाबी लक्षात घेऊन मंत्रीपद देण्यासाठी फडणवीस यांची पसंती ठाकूर यांच्यापेक्षा उपाध्याय ही असू शकते, असे सांगण्यात आले. (Vidya Thakur)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.